vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठीजलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगलीत जल व्यवस्थापन व पीक पद्धतीवर कार्यशाळा उत्साहात 

शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठीजलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- सांगलीत जल व्यवस्थापन व पीक पद्धतीवर कार्यशाळा उत्साहात

 

 सांगली, प्रतिनिधी– बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमिवर दुष्काळ व अतिवृष्टी या दुहेरी आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्य शासनाने जल व्यवस्थापनासाठी शाश्वत दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन राज्य स्तरावर सुरू असून, सर्वांच्या सहभागाने ते यशस्वी करण्यात येईल. या अनुषंगाने शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक ठरत आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

 सांगली पाटबंधारे मंडळाच्या वतीने आयोजित “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026” च्या नवव्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वारणाली वसाहतीतील सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, रोहित कोरे, अभिनंदन हारूगडे, के. एल. मासाळ, प्रज्ञा पाटील, हर्षद यादव आणि राजन डवरी आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

 जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत दि. २५ ते २९ एप्रिल या कालावधीत गोदा ते नर्मदा अशी यात्रा काढण्यात येणार आहे. यातून जलप्रबोधनाची चळवळ प्रगल्भ होईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हवामान अंदाजात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने पावसाच्या अनियमिततेचे पूर्वानुमान शक्य होत आहे. या वर्षी जून व जुलै महिन्यात कमी पाऊस व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जल व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन नियोजन करून काटकसरीने पाणी वापरण्याची गरज व्यक्त करून याबाबत जनप्रबोधन करण्यासाठी हा पंधरवडा उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली व कोल्हापूरमधील पूरव्यवस्थापन व पूर येऊ नये यासाठी सांडपाणी व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेकडून ६०० कोटी रुपये रुपये निधीची तरतूद करण्यात आली आल्याचे सांगताना त्यांनी मिरज लातूर जलदूत एक्स्प्रेस ट्रेनचा दाखला देत शासन विविध योजनांद्वारे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले.

. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उपसा सिंचन योजनांचे पाणी बंद जलवाहिनीद्वारे वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, त्यांना जमिनीचे वार्षिक भाडे दिले जाणार आहे. तसेच, महानगरांमध्ये सांडपाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सोदाहरण सांगितले. तसेच, या पंधरवड्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या अनुषंगाने त्यांनी अहिल्यादेवींनी जलव्यवस्थापनाबाबत केलेल्या उपाययोजना सांगितल्या. तसेच, पाण्याशिवाय शेती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा. शेतीसाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे ते म्हणाले.

 नवव्या पुष्पअंतर्गत पीक पद्धती, उत्पादकता वाढ व पाणी नियोजन या विषयांवर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत पीक पद्धतीत बदल, उत्पादनवाढ आणि जलसंसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात तज्ज्ञ डॉ. सचिन महाजन व डॉ. श्रीमंत राठोड यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन व उत्पादनवाढीच्या उपायांवर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तकांच्या स्टॉलचे मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन समता रॅली व नागार्जुन संग्रहालयाचे उद्घाटन

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

🌞 🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात कोरोना वाढता प्रभाव, एका दिवसात 65 नवे रुग्ण, मुंबईत 22 संक्रमित, पुन्हा लॉकडाऊन ?आरोग्य विभाग नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन

मतदानाचे आवाहन करणा-या मतदान यंत्राच्या मॅस्कॉटला नवी मुंबईकर नागरिकांची पसंती

गुटखा आणि प्रतिबंधितपदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन..

vishwatmaklokswamivarta