vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 10 मे रोजी आयोजन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा लाभ

जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे 10 मे रोजी आयोजन जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा लाभ

 

रायगड, प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात दि.10 मे 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी  दिली आहे.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित असलेली, दिवाणी आणि तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, विवाह विषयक प्रकरणे तसेच ग्रामपंचायतीच्या घरपट्टी व पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर वित्तीय संस्थांच्या थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.

दि.10 मे 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि अधिकाधिक नागरिकांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड, अलिबाग ए. एस. राजदेकर यांनी केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

न्यायिक सेवा पूर्व प्रशिक्षणासाठी वकिलीचा अनुभव ३ वर्षांवरून १ वर्ष सामायिक चाळणी परीक्षा-२०२६ च्या ऑनलाइन अर्जात सुधारणा

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य योजनेच्या लाभार्थ्यांनी-आधारकार्ड व बँक पासबुकची प्रत तहसील कार्यालयात जमा करावी..

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले महत्वपूर्ण निर्णय. –

vishwatmaklokswamivarta

प्लाझमा, बीम लाईट, लेझर बीम लाईट, शार्प व प्रेशरमिडच्या वापरास प्रतिबंध..

vishwatmaklokswamivarta

उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजनांचे पालन करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन