vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी महाबळेश्वर दौऱ्याप्रसंगी दिली विविध ठिकाणांना भेट…

सातारा, प्रतिनिधी- पर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे महाबळेश्वर दौऱ्यावर होते. यावेळी मधाचे संग्रहालय व विक्री केंद्रास आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयास भेट दिली. तसेच त्यांनी महाबळेश्वर येथील निसर्गरम्य परिसराची आणि प्राचीन मंदिरांची पाहणी केली.

प्रथमतः त्यांनी पाच नद्यांचा संगम असणाऱ्या पंचगंगा मंदिरात जाऊन दर्शन घेतले व मंदिराची पाहणी केली. त्यानंतर जुने महाबळेश्वर मधील हेमाडपंथी वास्तुशैली असणाऱ्या व प्राचीन शिवमंदिर म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वैशिष्टपूर्ण मंदिराची पाहणी केली. कृष्णा नदीच्या उगमस्थानी वसलेल्या कृष्णामाई मंदिरात जाऊन देवीची पूजा केली व मंदिराची पाहणी केली.

या सर्व भेटीनंतर मधाचे संग्रहालय व विक्री केंद्र असणाऱ्या मधुसागर केंद्रास भेट दिली. तसेच मध उद्योगास चालना मिळावी म्हणून स्थापन केलेल्या मध संचालनालयाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी मध उत्पादन, मध विक्री व मध संकलन यासंबधी माहिती जाणून घेतली. तसेच मधासंदर्भात स्थानिक व्यवसाय व स्थानिक उत्पादने यांची माहिती घेऊन व्यवसायिकांना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण उद्योगांना चालना देणाऱ्या आणि स्थानिक कारागिरांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या महाबळेश्वर येथील प्रादेशिक कार्यालयाला भेट दिली.यावेळी खादी आणि ग्रामीण उद्योगातून बनलेल्या वस्तूंच्या उत्पादनाची माहिती घेतली.

यावेळी ते म्हणाले, ” थंड हवेचे ठिकाण’ किंवा ‘गिरीस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी देश-विदेशात दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देत असतात. याच पद्धतीने महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळांचे ब्रँन्डिग करुन त्याठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील याचाही पर्यटन विभागाचा मंत्री या नात्याने या दौ-यात पाहणी करुन व माहिती घेऊन अभ्यास केला.”

याप्रसंगी महाबळेश्वरच्या तहसीलदार श्रीमती तेजस्विनी खोचरे पाटील,विशाल जाधव, तलाठी सागर शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सक्षम कौशल्य जनगणना’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

अशोक कांबळे यांच्या हत्येचा तिव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण,सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 34 हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी**नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींकरीता आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शन सत्रे*

vishwatmaklokswamivarta

महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडु महाप्रसाद वाटप समितीची निवड

जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहनासाठी शासन तत्पर -कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta