vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 34 हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी**नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींकरीता आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शन सत्रे*

 *‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत 34 हजाराहून अधिक नागरिकांची तपासणी**नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थिनींकरीता आरोग्यविषयक विशेष मार्गदर्शन सत्रे*

नवी मुंबई प्रतिनिधी-महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंबाच्या, समाजाच्या तसेच संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी आहे. त्या अनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हे अभियान महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या पोषण महिन्याशी संलग्न करुन राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिकेच्या 5 रुग्णालयांमध्ये व 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दररोज महिला व पुरुषांची सामान्य आरोग्य तपासणी तसेच नियोजित वेळापत्रकानुसार विशिष्ट तज्ज्ञ सेवा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. 17 सप्टेंबरपासून अभियानांतर्गत एकूण 218 शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ 18815 महिला व 15915 पुरूष अशा एकूण 34733 लाभार्थ्यांनी विविध तज्ज्ञांच्या सेवांसह घेतला आहे.

स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीबद्दल मार्गदर्शनाची विशेष सत्रे घेण्यात आली. यामध्ये मासिक पाळी सुरू होताना शारीरिक विकासामुळे होणारे बदल काय असतात तसेच मुलींना मासिक पाळी का येते, मासिक पाळी दरम्यान स्वच्छता कशी राखावी, शरीराच्या विकासासाठी घ्यावयाचा पोषक आहार, मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासावर किंवा अडचणींवर उपाय याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून शंकांचे निरसनही करण्यात आले. या अभियानामध्ये 2264 किशोरवयीन शालेय मुली यांनी समुपदेशनाचा लाभ घेतला.

‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ अभियान महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रभावीपणे राबविण्यात येत असून जास्तीत जास्त महिलांनी व बालकांनी यामध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा- माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे

नागपूर बोर्डात समस्या निवारण सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्‍या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चा..

नारी शक्तीचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेस च्या नेत्याचा जाहीर निषेध – संगीताताई गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्ह्यात २९ सप्टेंबर रोजी १८ ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन    :- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

vishwatmaklokswamivarta

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य-: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी..

vishwatmaklokswamivarta

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम