vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-विदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड संस्थेचे सहकार्य..

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-विदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड संस्थेचे सहकार्य..

 

बुलडाणा, प्रतिनिधी : नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्य विषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता टाळण्यासाठी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वी करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. शासनाचे हे मिशन पूर्णत्वास नेण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड या संस्थेने सर्वतोपरी सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
मोतीबिंदूमुळे येणारी दृष्टिहीनता आणि त्यावर उपाययोजना म्हणून २०१७ पासून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन सुरू आहे. शासनाने हाती घेतलेल्या या मिशनची २०१८ मध्ये नव्याने सुरवात करण्यात आली आहे. येत्या २०२७ पर्यंत हे मिशन यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टिने विदर्भात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) ही संस्था इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (आयजीएमसी), नागपूर यांना मदत करत आहे. डब्ल्युसीएल या संस्थेच्या माध्यमातून आयजीएमसी, नागपूर यांनी गेल्या वर्षभरात साधारण चार हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रीया केल्या आहेत. तसेच शासनासोबत केलेल्या कराराच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन स्वप्नपूर्तीसाठी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने संपूर्ण विदर्भात विविध उपक्रम राबवून यापुढील तीन वर्षात दरवर्षी साधारण चार हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील ही संस्था सहकार्य करणार आहे.
ही संस्था विदर्भातील ग्रामीण भागामध्ये शिबीर घेऊन ज्यांना मोतीबिंदू आहे त्या रुग्णाचे निदान करून त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवून त्यांच्यावर मोफत उपचार करतील. तसेच या मार्फत रुग्णालयांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतील. डब्ल्यूसीएल संस्थेचे मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशनच्या यशस्वीतेसाठी शासनाला असलेले सहकार्य पाहून इतर स्वयंसेवी संस्था देखील या कामात पुढाकार घेतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
00000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (MCED) तर्फे ‘इम्पोर्ट एक्सपोर्ट’ प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर येथे 19 जुलै रोजी  भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा….

बँक ऑफ महाराष्ट्रच्या लीज व्यवहारातील संभाव्य अनियमिततेबाबत स्वतंत्र चौकशीची मागणी – खासदार डॉ. कल्याण काळे यांचे अर्थमंत्र्यांना पत्र

रायगड आणि आसपासच्या भागांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी …

vishwatmaklokswamivarta

महत्त्वाचा संदेश.- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल…

vishwatmaklokswamivarta

रांजणगाव गणपती, कारेगाव, ढोकसांगवीसह हिवरे ग्रामपंचायतींच्यापायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या प्रश्नांवर बैठक

vishwatmaklokswamivarta