vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

           जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यात आगामी सण, उत्सवात शहरातील मिरवणुका व विविध कार्यक्रम आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.2 मे 2025 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

      संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 2 मे 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंतीचा उत्सव समिती बुलढाणा..प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!

vishwatmaklokswamivarta

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणे हीच खरी सुरक्षितता – गडचिरोली पोलिस

vishwatmaklokswamivarta

शेती उत्पादन वाढ, शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- कृषि विभागाच्या शेतकरी परिसंवादात प्रतिपादन- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन

नागरिकांनी खादीचा वापर वाढवावा – जिल्हाधिकारी आशिष येरेकर कुटीर महोत्सवाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

ज्ञानज्योती व वसतिगृह प्रवेश योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू!17 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन