सर्वात भीषण दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरच्या पहेलगाम मध्ये हिंदू नाव घेऊन पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर
सर्वात भीषण दहशतवादी हल्ला जम्मू काश्मीरच्या पहेलगाम मध्ये हिंदू नाव घेऊन पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर
राज्य प्रतिनिधी -जम्मू कश्मीर पहेलगाम मध्ये दुर्दैवी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडून समोर येत आहे राज्य सरकारचे संपूर्ण प्रशासन दहशतवाद्यांना शोधण्यासाठी जोरदार तपास कार्याला लागले आहेत
जम्मू काश्मीरच्या पहेलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. सोशल मीडीयातून समोर आलेल्या व्हिडिओ मधून घटनास्थळी दाखल असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही मुस्लिम आहात का? असं विचारून हिंदूंवर धडाधड गोळ्या झाडून पर्यटकांना ठार मारलं. पहेलगाम मध्ये मंजुनाथ या कर्नाटकातील एका व्यावसायिकाची हत्या झाली आहे. मंजुनाथच्या पत्नीने घडला प्रकार सांगितला. तेव्हा आपल्या पतीच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. पल्लवी या मंजूनाथच्या पत्नी आणि त्यांचा 18 वर्षांचा मुलगा देखील तेथेच होता.
पल्लवी यांच्या समोर पतीला गोळ्या झाडल्यानंतर त्यांनी 3-4 हल्लेखोरांपैकी एका जवळ जाऊन जर माझ्या पतीला मारलं तर मलाही ठार करं असं म्हटलं तेव्हा त्यांनी तुला मारणार नाही. जा जाऊन सारा प्रकार तुमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाऊन सांगा. असं म्हटलं. पल्लवीच्या मुलानेही मला ठार कर असं म्हटलं तेव्हा त्यालाही हल्लेखोरांनी हात लावला नसल्याचं मीडीयाशी बोलताना सांगितलं आहे. पल्लवीने दिलेल्या माहितीनुसार, पहेलगाम मध्ये अंदाजे 500 पर्यटक होते. अनेक नव्याने लग्न झालेली जोडपी होती पण हल्लेखोरांनी बहुतांशी पुरूषांनाच ठार केले. पल्लवीचे पती त्यांच्या मुलाने सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते म्हणून ब्रेड आणायले गेले. तेव्हा गोळीबार झाला. सुरूवातीला त्यांना हा गोळीबार आर्मीचा असेल असं वाटलं. पण नंतर त्यांनी पतीच्या डोक्यात गोळी मारल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. कर्नाटक राज्यातील पल्लवी या शिवमोगा येथील आहे. त्यांनी मला पतीसह एअरलिफ्ट करा. आम्हांला एकटं परत जायचं नाही असं म्हटलं आहे. पल्लवी या बॅंक मॅनेजर आहेत तर त्यांचे पती बांधकाम व्यवसायामध्ये होते. मंजुनाथ यांच्या आईला अद्याप मुलाच्या निधानाची माहिती देण्यात आलेली नाही. दहशतवाद्यांनी गोळ्या मारताना असे म्हणाले की ‘जा जाऊन मोदींना सांगा’ कर्नाटक मधील व्यावसायिकाला ठार मारल्यानंतर त्याच्या पत्नीवर खेकसला हल्लेखोर जम्मू कश्मीर च्या पहेलगा मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामध्ये 26 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. अद्याप अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला नसला तरीही मुख्यमंत्री मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन पुरूषांचा समावेश असल्याची माहिती दिली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, दिलीप डिसले आणि डोंबिवलीचे अतुल मोने अशी मृत पर्यटकांची नावं आहेत. पनवेलचे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव हे दोन पर्यटक जखमी झाले आहेत. सोबतच पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 54 वर्षीय
संतोष जगदाळे देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. PTI शी बोलताना संतोष यांच्या 26 वर्षांच्या मुलीने,अअसावरी जगदाळेने सारा प्रसंग सांगितला आहे. हल्ला झाला तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकून ते एका झोपडीत लपले होते. हल्लेखोर तेथे आला. त्याने संतोष यांना इस्लामिक मंत्र म्हणायला सांगितले. मात्र संतोष ते बोलू न शकल्याने त्यांच्या डोक्यात आणि कानामागून, पाठीत अशा 3 गोळ्या झाडल्या. संतोष जगदाळे हे पुण्यात व्यावसायिक आहेत.
संतोष जगदाळे खाली पडल्यानंतर त्यांच्या भावावरही हल्ला केला. आसावरीच्या माहितीनुसार ते 5 जण एकत्र होते. मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणार्या पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये ते आले होते. दरम्यान आसावरीला अद्याप तिचे वडील आणि काका जिवित आहेत की मृत हे ठाऊक नसल्याची माहिती त्यांनी प्रशासनाला दिली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे