vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी

 

रायगड प्रतिनिधी:-22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन व 1 मे महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधून दि.22 एप्रिल ते दि.1 मे 2025 या कालावधीत वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झालेल्या आढावा बैठकीत दिले.

जागतिक वसुंधरा दिनाची यावर्षीची (म्हणजे सन 2025 ची थीम “आमची शक्ती, आमचा ग्रह” (Our Power, Our Planet) ही आहे.या कार्यक्रमाचे ब्रीद वाक्य “पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ” (“पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा “) अस राहील.दि.22 एप्रिल ते दि.30 एप्रिल 2025

या कालावधीत निसर्गाच्या “पंचमहाभूतांच्या” भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) या घटकांपैकी किमान एका घटकावर दररोज काम करण्यात यावे. यामध्ये प्रामुख्याने सध्या घडत असलेले वातावरणातील बदलांमागची कारणे नागरीकांना समजावून सांगून एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी वैयक्तीकरित्या अथवा सामुहिकरित्या पर्यावारणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी एक छोटेसे पाऊल उचलल्यास वातावरणातील हे बदल काही अंशी कमी होण्यास मदत होवू शकेल. तसेच, शाळा व कॉलेज यामध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे. सदर स्पर्धेचे उद्दिष्ट आपल्या वसुंधरेचे संरक्षण व संवर्धन हे असावे.

दि.22 एप्रिल ते दि.24 एप्रिल, 2025 या तीन दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नदी, ओढे, नाले, तलाव व समुद्रकिनारे यांची स्वच्छता करण्याचा कार्यक्रम आयोजित करून सदर कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आणि विविध सामाजिक संस्था यांचा सहभाग घेण्यात यावा.दि.25 ते दि.27 एप्रिल 2025या तीन दिवशी Reduce-Reuse-Recycle यावर आधारित विविध प्रयोगांचे आयोजन शाळा, महाविद्यालये, विविध शैक्षणिक संस्थामध्ये व इतर ठिकाणी करण्यात यावे. या प्रयोगांमधून सर्वोत्तम तीन प्रयोगांची (उमेदवारांची) निवड करून त्यांचा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात यावा.

 दि.28 ते दि.30 एप्रिल 2025 या कालावधीत “पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ” या मा. मंत्री महोदया यांच्या ब्रीद वाक्यानुसार पर्यावरणाशी अनुषंगीक एक ब्रीद वाक्याबाबतचे अभियान/स्पर्धा आयोजित करण्यात यावी, प्राप्त होणाऱ्या ब्रीद वाक्यांमधून तीन उत्कृष्ट ब्रीदवाक्ये निवडण्यात यावीत. निवड केलेल्यांना प्रामणपत्र देवून सन्मानित करण्यात यावे. सदर ब्रीदवाक्य येत्या वर्षात पर्यावरणविषयक विविध कार्यक्रमांमध्ये वापरावे. प्रत्येक जिल्ह्यातून हि तीन ब्रीदवाक्ये राज्याच्या पर्यावरण दिनाच्या विविध जाहीरात फलकातून जिल्हयातील विविध ठिकाणी दर्शविण्यात यावीत.

दि. 22 ते दि.30 एप्रिल 2025 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे व स्पर्धाचे आयोजन करुन निवड केलेल्यांचा सन्मान दि. 01 मे 2025 च्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमामध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री महोदयांचे हस्ते करण्यात यावा व दिनांक 1 मे रोजी प्रदूषण मुक्त महाराष्ट्र दिन साजरा करण्यात यावा

संबंधित पोस्ट

तामिळनाडूतील पेरियार विद्यापिठाच्या कुलपतींकडून ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा..

vishwatmaklokswamivarta

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे शतक महोत्सव व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कोपरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार 

मुंबईतील कबुतरांना नियंत्रित खाद्य पुरवण्याचा निर्णय नागरिकांवर, आजपासून हरकती, सूचना नोंदवता येणार…

जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन-संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी…

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा राष्ट्रीय नमुना पाहणीची ७५ वर्षे ही मध्यवर्ती संकल्पना

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन ‘एनएडीपी’त दीक्षान्त समारंभ उत्साहात