vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी अर्ज मागविले.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारसाठी अर्ज मागविले.

.

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. शौर्य, क्रिडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्यावरण, कला – संस्कृती आणि नवोन्मेष या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो.

अर्ज नामांकन https://awards.gov.in या संकेतस्थळा मार्फत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांचे वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी, पंचायत राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ.अर्ज करु शकतात. जिल्ह्यातील अशा बालकांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट,कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती..

सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्थेत शारिरीक प्रशिक्षण निदेशकाची आवश्यकता

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी ‘जल अर्पण दिवस’ उपक्रम 💧

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांची टीका …

जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन…