vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

एनसीसी प्रशिक्षणांतर्गत भोजनखर्चाचे दरपत्रक ५ मे पर्यंत पाठविण्याचे आवाहन

एनसीसी प्रशिक्षणांतर्गत भोजनखर्चाचे दरपत्रक ५ मे पर्यंत पाठविण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : सांगली व एनसीसी भवन कोल्हापूर या ठिकाणी वेगवेगळी एनसीसी छात्रसेनेची वार्षिक प्रशिक्षण शिबीरे माहे मे ते जून 2025 व जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये सांगलीच्या 16 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रतीदिन सकाळी न्याहारी, चहा, बिस्कीट, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा बिस्कीट व संध्याकाळी जेवण हे शिबीर अन्नश्रेणी यादी (मेनु) नुसार पुरवठा करण्यासाठी (प्रत्येक व्यक्ती प्रती दिन) खर्चाचे दरपत्रक मागविण्यात आले आहे. दरपत्रक दि. 5 मे 2025 पर्यंत मा. समादेशक अधिकारी, 16 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना कार्यालय, विश्रामबाग, विलिंग्डन कॉलेज परिसर, सांगली-416415 यांच्याकडे पोहोचतील या प्रमाणे पाठविण्यात यावीत, असे 16 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सांगली चे कमांडिंग अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

   प्रशिक्षण शिबीरनिहाय, कालावधी व कंसात प्रशिक्षणामध्ये भाग घेणाऱ्या छात्रांची संख्या अनुक्रम पुढीलप्रमाणे. वार्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 309 – 24 मे 2025 ते 2 जून 2025, (600). वार्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 320 – 11 जुलै 2025 ते 20 जुलै 2025, (320). वार्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 321 – 21 जुलै 2025 ते 30 जुलै 2025, (510). वार्षिक प्रशिक्षण शिबीर क्र. 331 – 25 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर 2025, (100).

या सर्व प्रशिक्षण शिबीरासाठी सकाळी न्याहरी, चहा, बिस्कीट, दुपारचे जेवण, सायंकाळी 4 वाजता चहा, बिस्कीट, संध्याकाळी शाकाहारी व मांसाहारी जेवण प्रती दिन प्रती व्यक्ती दर असा दर पत्रकमागणीचा तपशील असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत छाप्यातून १३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान महात्मा गांधी सप्ताहात झाली कारवाई

vishwatmaklokswamivarta

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे कालमर्यादा आखून पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यंत्रणांचा योजनानिहाय आढावा…

vishwatmaklokswamivarta

शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतांडव स्तोत्र पठण कार्यक्रमाला उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहातप्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ : स्टार्टअप रँकिंगमध्ये ‘लीडर्स’ श्रेणीत महाराष्ट्राचा सन्मान

vishwatmaklokswamivarta