vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!… हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!… हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

 

   राज्य प्रतिनिधी-  सनातन संस्थेच्या माध्यमातून गेली २५ वर्षे अविरतपणे हिंदु राष्ट्रासाठी जागरण करत असलेले परमश्रद्धेय डॉ. जयंत आठवले यांचे कार्य अलौकिक आणि अत्यंत विलक्षण आहे. त्यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ महोत्सव नसून भारताला पुन्हा तेजस्वी, समर्थ बनवण्याचा आणि सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्याचा जागर आहे, असे गौरवोद्गार ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी महोत्सवासाठी पाठवलेल्या शुभसंदेशात काढले आहेत.

  ते पुढे म्हणाले की, ‘सनातन संस्था’च्या माध्यमातून गेल्या २५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कार्याची फलश्रुती म्हणून आज हजारोंच्या संख्येने समर्पित कार्यकर्ते स्थानस्थानावर जाऊन निष्काम भावनेने व स्वयंशिस्तीने सनातन धर्माचा प्रसार करत आहेत. या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवनाचा स्वाध्याययज्ञ, सेवायज्ञ आणि लोकजागरणयज्ञ सुरू केला आहे. हे कार्य अत्यंत विलक्षण आहे आणि त्यातूनच सनातन राष्ट्राच्या अभ्युदयाचा मार्ग उजळणार आहे.

महोत्सवात विविध राष्ट्रनिष्ठ नेते, धर्माचार्य, कार्यकर्ते आणि सनातनप्रेमी एकत्र येऊन विचारमंथन करणार आहेत. या मंथनातून केवळ नवनीत नव्हे, तर अमृत उदयाला येईल आणि याच अमृतकलशातून सनातन राष्ट्राला नवतेज प्राप्त होईल. आज भारताला समर्थ राष्ट्र बनवायचे असेल, तर सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वांची पुनःस्थापना करणे अत्यावश्यक आहे; कारण भारताच्या सामर्थ्यावरच जगात समता, बंधुता आणि खरी स्वतंत्रता टिकू शकते. म्हणूनच हे कार्य एखाद्या व्यक्तीचे किंवा एखाद्या संस्थेचे नसून, धर्माचे आणि राष्ट्राचे कार्य आहे. आणि म्हणूनच हे प्रत्यक्ष भगवानाचे कार्य आहे.

 त्यामुळे सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रनिष्ठ कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, धर्मगुरूंनी आणि सामान्य भक्तांनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या श्रद्धेचे आणि सेवाभावाचे योगदान द्यावे. सनातन धर्माची मूळ अधिक बळकट करण्यासाठी आणि भारताच्या सुंदर, समृद्ध भविष्यासाठी हा महोत्सव एक सुवर्णसंधी आहे. या महामंथनातून मिळणाऱ्या तेजाने भारत गगनभरारी घेईल आणि सनातन धर्माचा दिव्य प्रकाश संपूर्ण जगात पसरेल. म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन या दिव्य कार्यात सहभागी होऊया आणि भारताला त्याच्या सनातन तेजाने पुन्हा उभे करूया, असेही आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.श्री. चेतन राजहंस प्रवक्ते, सनातन संस्था यांची माहित

संबंधित पोस्ट

महात्म ज्योतीबा फुले जयंती उत्सव समितीच्याअध्यक्षपदी बाबासाहेब वानखेडे, कार्याध्यक्ष सुरेश रत्नपारखे

नवरात्रोत्सव विशेष वृत्तमालिका भाग 2 महिला व बालविकास विभागाच्या योजनांतून निवारा, आर्थिक मदत व कायदेशीर मदतीचा आधार महत्त्वाचे संपर्क क्रमांक वुमन हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 181 समस्याग्रस्त बालकांच्या मदतीसाठी टोल फ्री हेल्प लाईन 1098

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय चाचा नेहरु  बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात …       

vishwatmaklokswamivarta

एम.सी.ई.डी. तर्फे मंगळवारी (दि.४) उद्योजकता विकास प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

एल्डर लाईन – 14567 ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन

खुल्या प्रवर्गातील युवकांना २१ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण‘अमृत’चा उपक्रम