vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी नोंद करण्याचे आवाहन

 आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी नोंद करण्याचे आवाहन

 

जालना, प्रतिनिधी: राज्यातील 20 जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या Up scaling apda Mitra या योजनेचे यश विचारात घेऊन उर्वरित 16 जिल्ह्यात ‘आपदा मित्र’प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजीचे शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यामधून एकूण 300 आपदा मित्रांना (स्वयंसेवक) आपत्ती व्यवस्थापन विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपदा मित्रांत नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी NCC/NSS विद्यार्थी, NGO, आशा, पोलिस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक, शासकीय/निम शासकीय कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.

सहभागी होणा-या प्रशिक्षणार्थीना 12 दिवसाचे निवासी प्रशिक्षण, वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच (ERK), 3 वर्षाकरिता 5 लाखाचे विमा संरक्षण राज्य शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील कीट आपदा मित्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येईल

: आपदा मित्र निवड निकष,    सदर व्यक्ती हि भारताची नागरिक असावी व संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावी. सदर व्यक्ती हि शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावी. वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष (माजी सैनिक, डॉक्टर, स्थापत्य अभियंता, शास्त्रज्ञ, आपत्कालीन सेवेतून सेवानिवृत अधिकारी व कर्मचारी यांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल त्याकरिता वयोमर्यादा 55 वर्षे असेल मात्र त्यांना विमा सुरक्षा देता येणार नाही.) आपदा मित्र प्रशिक्षणामध्ये किमान 35% महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे.     जालना जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपत्ती व्यवस्थापनामध्ये “आपदा मित्र (आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारा स्वयंसेवक) म्हणून स्वेच्छेने प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीने आपत्ती शाखा क्रिस्ताविकारी कार्यालय जालना अथवा आपल्या नजीकच्या तहसील कार्यालय येथे नाव नोंदणी करावी.

संबंधित पोस्ट

केदारनाथहून गुप्तकाशीकडे जाणारं हेलिकॉप्टर आज सकाळी सुमारे ५:२० वाजता गौरीकुंडजवळ कोसळले.हेलिकॉप्टरमध्ये ६ प्रवासी (५ प्रौढ, १ बालक) व पायलट होते. हे प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात येथील होते.

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद निवडणुकीमुळे शेगाव येथील मंगळवारचा आठवडी बाजार रद्द…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राने दूरदृष्टी नेतृत्व गमावले-अजितदादा पवार यांना सर्व पक्षीय शोकसभेत श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पीसीएमच्यावतीने वृत्तपत्र व पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा-नियोजनबध्द व शिस्तीत पार पाडावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ· जालना जिल्‍ह्यातील 30 केंद्रावर एकुण 9 हजार 760 विद्यार्थी देणार परिक्षा· परीक्षेदरम्‍यान अनुचित प्रकार करणाऱ्या विरुध्द गुन्‍हा दाखल होणार

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश