vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री मकरंद जाधव पाटील· पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण· पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धाजंली.

 जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री मकरंद जाधव पाटील· पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण· पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धाजंली.

 

राज्य प्रतिनिधी बुलढाणा,: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करू या आणि बुलढाणा जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ या, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद जाधव पाटील यांनी महाराष्ट्र दिनी केले.

पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 66 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अजिक्य गोडगे, माजी आमदार विजयराज शिंदे, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसाय वाढीस लागण्यासाठी यावर्षी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत 4 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबागेची लागवड केली असून शेतीपूरक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रतिसाद देत आहेत.

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना व अटल भूजल योजनेंतर्गत सुमारे 33 हजार लाभार्थ्यांना सुमारे 79 कोटी रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामामध्ये नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 1 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 144 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. अवेळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीमुळे सुमारे 4 लाख शेतकऱ्यांचे 3 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले होते. त्याकरीता शासनाने सुमारे 490 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन वाटप करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 19 व्या हप्त्याचा सुमारे 3 लाख 50 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले

पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक, म्हणजेच फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 47 हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत. ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही आपला फार्मर आयडी तयार केला नाही, असे शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित आपले शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

संबंधित पोस्ट

स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये महाराष्ट्राने स्वच्छतेच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत *भारताच्या सर्वात ‘स्वच्छ राज्य’चा प्रतिष्ठेचा किताब पटकावला! राज्यातून – 1 सेवन स्टार, 2 फाइव स्टार, 82 वन स्टार गार्बेज फ्री शहरांचा दर्जा आणि 261 ओडीएफ़ प्लस प्लस शहरांचा मान मिळाला

कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी सर्वसमावेशक ॲप व संकेतस्थळ विकसित करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारताचा 76 वा प्रजासत्ताक आज दिन रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी साजरा होत26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नमुंमपा मुख्यालयातील ध्वजारोहणप्रसंगी सकाळी 8 वा. उपस्थित राहण्याचे नागरिकांना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

महाडिबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज वेळेत मंजुरीसाठी सादर करा ‘ऑटो रिजेक्ट’ अर्जांना मुदतवाढ मिळणार नाही

vishwatmaklokswamivarta

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…

प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडा पुरस्काराचे वितरण ,क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन