vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत,फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज स्पर्धा..

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत,फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज स्पर्धा..

मुंबई प्रतिनिधी

: जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) आणि इमेजनेशन स्ट्रीट आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “फिल्म पोस्टर मेकिंग चॅलेंज” स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली.

डिजिटल पोस्टर्स स्पर्धेसाठी ५४६ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्वोत्तम ५० पोस्टर्स ‘क्रिएटोस्फेअर्स’मध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. तर हँड-पेंटेड पोस्टर्ससाठी, २ मे रोजी चार संस्थांमधील १० अंतिम स्पर्धकांनी प्रत्यक्ष रंगकाम करत स्पर्धेत सहभाग नोंदवला.

हँड-पेंटेड फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सुवर्ण पदक – दृश्या ए. (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे)

रौप्य पदक – आदिशा ग्रोव्हर (कॉलेज ऑफ आर्ट, दिल्ली विद्यापीठ)

कांस्य पदक – तमन्ना सूरी (चितकारा युनिव्हर्सिटी, पंजाब)

डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सुवर्ण पदक – सुरेश डी. नायर (कोची)

रौप्य पदक – सप्तसिंधु सेनगुप्ता (कोलकाता) कांस्य पदक – शिवांगिनी सर्मा कश्यप (आसाम)

डिजिटल फिल्म पोस्टर्स स्पर्धेसाठी छायाचित्रकार आणि म्युसेओकॅमेराचे संस्थापक संचालक आदित्य आर्य, प्रिंटमेकरचे उपप्राचार्य आनंदमॉय बॅनर्जी यांनी तर हँड-पेंटेड पोस्टर्स स्पर्धेसाठी चित्रपट निर्माते आणि व्हिसलिंग वूड्सचे प्राध्यापक शरद राज यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

००००

संबंधित पोस्ट

जिल्हा विकास आराखड्यांतर्गत धोरणात्मक कामांसाठीजिल्हा वार्षिक योजनेतील 25 टक्के निधी राखीव ठेवावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न- सन 2026-27 साठी 676 कोटी 29 लाख रूपये नियतव्यय मंजूर – गत आर्थिक वर्षातील निधी जवळपास 100 टक्के खर्च

महानगरपालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियोजन जाहीरनामा प्रसिध्द

जागतिक महिला दिन नवी मुंबईत उत्साहात साजरा* 

ग्रंथ पूजनाने ठाणे ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न…

vishwatmaklokswamivarta

बेदरकार ड्रायव्हिंग आणि वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी रडार इंटरसेप्टर वाहन कार्यान्वित- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- गेल्या दोन महिन्यात महामार्गावर नियम उल्लंघन करणाऱ्या 2055 वाहनधारकांना ई चालान जारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट आकाशात उजळला महामानवाच्या तेजाचा प्रकाश; ड्रोनच्या भव्य रोषणाईतून मानवंदना