vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

गेमिंग केवळ करमणूक नसून आगामी काळातडिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरेल,· ‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ विषयावर चर्चासत्र..

गेमिंग केवळ करमणूक नसून आगामी काळातडिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरेल,· ‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ विषयावर चर्चासत्र..

 

मुंबई प्रतिनिधी :- गेमिंग हे करमणुकीचे माध्यम आहे. मनोरंजनासोबत, गेमिंग आता केवळ करमणूक नसून डिजिटल परिवर्तनाचा मुख्य घटक ठरत आल्याचे मत वेव्हज २०२५ मध्ये आयोजित वेव्हजएक्स या चर्चासत्रात मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्हज-२०२५ समिटमध्ये वेव्हजएक्समध्ये ‘बिलियन डॉलर बेट्स पॉवरेड बाय लुमिकाई इन्व्हेस्टर विव ऑन गेमिंग्स नेक्स्ट फ्रंटियर’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात या क्षेत्रातील तज्ञ दीपेन पारीख, ओथमान अलहोकैल (othman alhokail), शिवानंद पारे यांनी सहभाग घेतला.

गेमिंग हे आता केवळ करमणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते जगातील सर्वात प्रभावशाली कंटेंट फॉर्म बनले आहे. भारतातही गेमिंग क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे.भारतात सध्या ५० कोटींपेक्षा अधिक मोबाईल गेमर्स आहेत. मजबूत डिजिटल पायाभूत सुविधांमुळे गेमिंगमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे.

UPI मुळे भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचे युग सुरु झाले आहे. डिजिटल परिवर्तनात UPI ने महत्त्वाची भूमिका बजावली असून UPI मुळे डिजिटल व्यवहार सुलभ झाला. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या आता डिजिटल व्यवहारांमध्ये सहभागी होत आहे.

भारत हा गेमिंग उद्योगासाठी एक अतुलनीय संधी आहे. भारतात उच्च कार्यक्षमतेचे स्टार्टअप्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर हे सर्व घटक उत्कृष्ट गेम डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त ठरत आहेत. स्थानिक बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन तयार होणारे गेम्स जागतिक स्तरावरही लोकप्रिय होतील असे मत चर्चेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केले.

 

००००

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना …

पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा सतर्क – नवी मुंबईतील परिस्थिती सुस्थितीत

vishwatmaklokswamivarta

23 व्या ‘प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका नगररचना विभागाचा माहितीपूर्ण स्टॉल

vishwatmaklokswamivarta

आदिवासी आश्रम शाळांमध्ये 1 फेब्रुवारीपासून नवीन वेळापत्रक लागू होणार – आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके*आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सेवासुविधांकरिता भरघोस निधी उपलब्ध केला जाईल

vishwatmaklokswamivarta

जनगणना 2027 मध्ये नागरिक ऑनलाईन पोर्टलव्दारे करू शकतात स्वगणना…

महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा’विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाची कार्यशाळाकार्यशाळेत ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग…