vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद*

*महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद*

 

सातारा प्रतिनिधी पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग यांनी महाबळेश्वर येथे आयोजित केलेल्या महापर्यटन उत्सवाची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. या सांगता समारंभात सादर करण्यात आलेल्या शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलाकारांना उत्स्फूर्त दादही दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रा. राम विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील),आ. डॉ.अतुल भोसले, आ. सचिन पाटील, आदी उपस्थित होते.

या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. कार्यक्रमात भारुड, वारी, हास्य जत्रा, लावणी मराठी गीते, विनोदी प्रहसन अशा कार्यक्रमांबरोबरच महाराष्ट्र कीर्ती प्रतिष्ठान पुणे यांचे भव्य दिव्य असे शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. एकापेक्षा एक बहारदार, खुमासदार आणि दर्जेदार अशा या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीने पर्यटक, प्रेक्षक अशा सर्वांचीच मने जिंकली आणि तेवढीच दादही मिळविली.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी*

ठाणे जिल्ह्यात अवैध वसतिगृहातून 29 बालकांची सुटका; संचालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल*

मोताळा तालुक्यातील अवसायनातील 34 संस्थांची नोंदणी रद्द होणार;आक्षेप नोंदविण्याचे सहायक निबंधकाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 94 प्रकरणे पात्र…

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ उपक्रमाचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त आयोजन

नगर परिषद निवडणुकीनिमित्त जिल्हाधिकारी यांची अंबड येथे भेट

vishwatmaklokswamivarta