लातूर, प्रतिनिधी- छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार विक्रम काळे यांना ‘नवभारत’च्यावतीने ‘मराठवाडा आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातर्फे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला,
यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, अहमदपूरचे गटविकास अधिकारी संतोष माने, राजेंद्र जायेभाये, प्राचार्य जी. आर. मुंडे, डॉ. गणेश नागरगोजे, राजीव मुंढे, छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा प्रणिता सूर्यवंशी, प्रा. अंकुश नाडे, गंगाधर आरडले, राजकुमार जाधव, बाबासाहेब भिसे, राजकुमार मगर, विष्णू कराड, शिवकांत वाडीकर, परमेश्वर गित्ते आदी उपस्थित होते.