vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आज रंगणार बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील*समाज कल्याण विभागाचा पुढाकार

आज रंगणार बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील*समाज कल्याण विभागाचा पुढाकार

     अमरावती, प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून आयोजित ‘सामाजिक समता सप्ताहा’ निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. समाज कल्याण विभाग, अमरावतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे बुद्ध-भीम गीतांच्या बहारदार मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात शुक्रवार, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते समता, न्याय आणि बंधुतेचे प्रणेते होते. समाजातील अस्पृश्यता, जातीयता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. महिला आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन करत त्यांनी कायद्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली. अशा या थोर युगपुरुषाच्या विचारांचे स्मरण करणे आणि त्यांच्या कार्याला संगीतमय मानवंदना देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

  समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी नागरिकांना या प्रबोधनात्मक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.0000000

संबंधित पोस्ट

अहिल्यानगर जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी संगणक आणि सौर ऊर्जा प्रशिक्षण

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना पशुपालकांपर्यंत पोहचवावी – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

प्रॉपर्टी एक्स्पो 2025’ प्रदर्शनाची नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी- प्रदर्शनातील नवी मुंबई महानगरपालिकेच्या माहितीप्रद स्टॉलला अनेक विकासक व नागरिकांची भेट

vishwatmaklokswamivarta

सोशल मीडिया’ वरील संशोधनासाठी माहिती संचालक किशोर गांगुर्डे यांना पीएच.डी.

एसटीने घडविले 9.71 लाख भाविकांचे “विठ्ठल दर्शन”; 35.87 कोटी उत्पन्नाची नोंद- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचेजिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन