vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारत पाकिस्तान तणावात: पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात मुंबईतील लष्करी जवान मुरली नाईक शहीद; कुटुंबावर शोककळा परिसरात शोकाकुल वातावरण…

भारत पाकिस्तान तणावात: पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात मुंबईतील लष्करी जवान मुरली नाईक शहीद; कुटुंबावर शोककळा परिसरात शोकाकुल वातावरण…

 

राज्य प्रतिनिधी -भारत पाकिस्तान तणावात: पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात मुंबईतील लष्करी जवान मुरली नाईक शहीद; कुटुंबावर शोककळा परिसरात शोकाकुल वातावरण…

मुंबईच्या. घाटकोपर पूर्वे च्या कामराज नगर येथील रहिवासी असलेले लष्करी जवान मुरली नाईक (23) शुक्रवारी पहाटे पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यात शहीद झाले. जम्मू भागातील उरीजवळ पहाटे 3:00 वाजता हा हल्ला झाला. यावेळी मुरली नाईक तेथे ड्युटीवर होते. यासंदर्भात फ्री प्रेसने वृत्त प्रकाशित केलं आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील काफिदंडा गावातील रहिवासी असलेले मुरली नाईक 2022 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले होते. त्यांच्या शहीद होण्याने घाटकोपर परिसरात शोककळा पसरली आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारतातील विविध ठिकाणी ड्रोन हल्ले केले होते. 7 मे रोजी भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. प्रत्युत्तर म्हणून, गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानने विविध भारतीय सीमावर्ती भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या ड्रोन हल्ल्यात घाटकोपमधील मुरली नाईक यांनी आपला जीव गमवला.

विभागातील स्थानिक संघटना आणि राजकीय नेत्यांनीही वाहिली शहीद सैनिकाला श्रद्धांजली

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मुरली नाईक यांच्या निधनाबद्द शोक व्यक्त केला आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, ‘देशाच्या रक्षणासाठी श्री सत्य साई जिल्ह्यातील पेनुकोंडा विधानसभा मतदारसंघातील गोरंटला मंडल येथील मुरली नाईक नावाच्या सैनिकाच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. देशासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या शहीद मुरली नायक यांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.’ असे  म्हणाले

यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाजपा नेते कार्यकर्ते पदाधिकारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यांनी ही यावेळी श्रद्धांजली अर्पित केली

स्थानिक संघटना आणि राजकीय नेत्यांनीही वाहिली शहीद सैनिकाला श्रद्धांजली –

संबंधित पोस्ट

26 एप्रिलला नवी मुंबईत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोम यांची उपस्थिती*

ग्रंथोत्सवामुळे वाचनसंस्कृतीला चालना– सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल,जिल्ह्यात सर्वसुविधायुक्त चार अभ्यासिका स्थापन करणार

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा पहिला जिल्हा मेळावा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

नव वर्षानिमित्त प्रत्येक कार्यालयाने संकल्प करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

162 व्या स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने धारावी विभागात या जनता पार्टी धारावी विभागातील 90 फूट रोड कामराज शाळेसमोर मोफत वह्या वाटप आणि परीक्षा पॅड वाटप…

vishwatmaklokswamivarta

जागतिक योग दिनानिमित्त भाजपा जालना महानगर आणि योग भूमी परिवारातर्फे सामूहिक योगाभ्यास