vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी- पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसरात असणारे फार्म हाउस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर दि.९ जुलै २०२५ पर्यंतच्याकालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३(१) व (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम इ. च्या आयोजक, मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्स याचा वापर करु नये. कारण अशा वापर केल्यामुळे पायलटच्या दृष्यात अडथळा निर्माण होऊन लॅंडीग व टेकऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

अमृता सोपान शिंदेला सुवर्णपदक 

vishwatmaklokswamivarta

घरेलु कामगार आरोग्य तपासणी अभियानातील महिला रूग्णांवर पूर्णपणे मोफत उपचार करावेत  – जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

बीड नगरपरिषदेत विविध विकासकामांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

डॉ. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ येथे सरन्यायाधीशन्यायमूर्ती भूषण गवई यांचा सत्कार सोहळा संपन्न

बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात…बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदानाची नोंद झाली आहे.

vishwatmaklokswamivarta