vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून नालेसफाईच्या कामाची पाहणी…

 

मुंबई प्रतिनिधी-मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या, नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे सांगत नाल्यातून काढलेला गाळ ४८ तासांच्या आत उचलला जावा असेही निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. भांडुप येथील उषानगर, उषा कॉम्प्लेक्स, नेहरूनगर नाला वडाळा, दादर येथील धारावी टी जंक्शन जवळील नालेसफाईची पाहणी त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, माजी आमदार सदा सरवणकर, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरात आतापर्यंत झालेल्या कामांची माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली

.उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पाऊस वेळेआधीच सुरू झाला असला तरीही नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत मोठ्या नाल्याची ८५ टक्के तर छोट्या नाल्यांची ६५ टक्केपर्यंत सफाई पूर्ण झाली असून अजूनही १५ दिवस हातात आहेत. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होईल असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयाने नालेसफाई सुरू आहे. त्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. रेल्वेच्या कल्व्हर्ट खालील कचरा रोबोटच्या मदतीने स्वच्छ करण्यात येत आहे. महापालिकेने दरवर्षी पाणी साचणारी ठिकाणे निश्चित केली असून ४२२ ठिकाणी पंप बसवण्यात आले आहेत. तर दोन ठिकाणी होल्डिंग पौंड आणि १० ठिकाणी छोटे पंपिंग स्टेशन कार्यान्वित केले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले

. यावेळी त्यांनी विक्रोळी येथील सूर्यानगर या दरड प्रवण क्षेत्राला भेट देऊन येथे महापालिकेच्या वतीने संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश दिले. दरवर्षी याठिकाणी दुर्घटना घडत असल्याने स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असे संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. दादर येथील महापालिकेच्या सफाई कामगारांची वसाहत असलेल्या कासारवाडीला भेट देऊन बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, अभ्यासिका आणि येथे केलेल्या इतर कामांचाही त्यांनी आढावा घेतला.

००००

संबंधित पोस्ट

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल! राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान, तर निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार. आजपासून आचारसंहिता लागू! राज्य निवडणूक आयोगाची घोषणा….

vishwatmaklokswamivarta

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणीअन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती.

vishwatmaklokswamivarta

मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर- आस्थापनेने मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास तक्रार करण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढचा महिनाभर 15 टक्के पाणीकपात लागू…

vishwatmaklokswamivarta

तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जनजीवन विस्कळीत झालेल्या मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली

vishwatmaklokswamivarta