vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

कोणाही जीवाचा न घडो मत्सर -वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे ||

कोणाही जीवाचा न घडो मत्सर -वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे ||

अध्यात्मिक वार्ता-

ही खरी ईश्वराची भक्ती आहे. या दृष्टीने साधनामार्गामध्ये साधक म्हणून प्रवेश ज्यांनी केलेला आहे त्यांनी या दृष्टीने वागून आणखी सर्वांच्या सल्याने योग्य रीतीने वागून ही जी अखंड परंपरा चालत आलेली आहे ती परंपरा उत्तरोत्तर अखंड चालू रहावी आणखी आपलं आणि इतरांचे समाधान या दृष्टीने व्हावे अशा रीतीने परमेश्वराची, सद्गुरुंची प्रार्थना केल्यावर अशक्य असं कांहीही नाहीये. फक्त ती कार्यसिद्धी त्या जीवाच्या अंतःकरणातल्या श्रद्धा, निष्ठेवर अवलंबून आहे.

 स निश्चयेन योक्तव्यः योगः

. अनिर्विण्ण चेतसः

भगवान् सांगताहेत. अनुत्साह उपयोगी नाही. निश्चय पाहिजे हे साधन मला करायचे आहे. आणि निर्विण्ण नाही. नैराश्य नाही, उत्साहभंग नाही. एखाद वर्ष कुठं झालं किंवा थोडा साधना अभ्यास झाला की अजून आम्हाला अजून कांहीच मिळालं नाही, त्याला साधनेतअशा क्रिया होतात, आम्हांला साधनेत काहीच क्रिया होत नाहीत, आपण किती मागे आहो, अशा लेखी तक्रारी येतात. बहिरंग पाहूनच अशा तक्रारी येतात. आपण मागं असलो तरी पुढे जाऊ शकतो. श्रेष्ठ पुरुषाच्या सान्निध्यात – पंढरीमध्ये आलेलो आहोत ही भावनाही कमी झालेली आहे त्यामुळे अशा प्रकारे नैराश्य येते. नको बुवा काय हे ? असा उत्साह भंग होतो. तसा होऊन उपयोग नाही. एकेक महिना जसा गेला तसा ध्रुवाचा उत्साह जास्ती जास्ती वाढत गेलेला आहे.पहिल्या महिन्यात तीन दिवसांनी फळ भक्षण केलं . पुढे नुसती पानेच खाल्ली. त्याच्या पुढच्या महिन्यात नऊ दिवसांतून एकदाच पाणी घेतले .चौथ्या महिन्यात बारा दिवसांनी एकदा वायुचा आहार केला. म्हणजे बारा दिवस त्याचा कुंभक होत असला पाहिजे हे यावरून दिसतय. बारा दिवसानंतर पुन्हा श्वासोच्छ्वास आहे. वायुचा आहार कोणाला शक्य आहे ? माहित तरी आहे आहे का ? वायु ही आहाराची वस्तू आहे याची जाणीवही कोणाला होणे शक्य नाही. सद्गुरू नारद महर्षींच्या कृपेने चार महिन्यात ही अवस्था होऊन गेलेली आहे. तर अशी गुरू परंपरा भारत वर्षामध्ये लाभलेली आहे. आसे अनेक महात्मे व्यक्त किंवा अव्यक्त रुपाने अद्यापि आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे. आचार्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अव्यक्त रुप म्हणजे सर्वव्यापी स्वरुपामध्ये आणखी सद्गुरु आपले आहेत ही भावना ठेवून श्रद्धेने त्यांच्या चरित्राचे चिंतन हे मुख्य करायला लागल्यानंतर चित्ताला स्थैर्य प्राप्त होते .

 

क्रमशः —

संबंधित पोस्ट

*श्रावण महिन्याचे महत्त्व* 

vishwatmaklokswamivarta

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘मुरलीचे सूर’ कार्यक्रमातून कृष्णगीतांची सुरेल मैफल· ४ सप्टेंबर रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात विशेष सांस्कृतिक कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

🌺🌿🌺 १० फेब्रुवारी – अखंड समाधानाचा मार्ग : नामस्मरण: वृद्धांना उपदेश. 🌺☘🌺

vishwatmaklokswamivarta

शिखर शिंगणापूर स्वयंभू शिवमंदिर…

प्रकृतीची शुद्धता व मानवतेच्या उत्थानाच्या दिशेनेनिरंकारी मिशनचे एक स्वर्णिम पाऊल परिक्षेत्रामध्ये .. राबविले ‘स्वच्छ जल – स्वच्छ मन’ अभियानपाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी- निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज…

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या कलागुणांसाठी पारंपारिक मंगळागौर स्पर्धेचे आयोजन