vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई कारवाईत अंदाजे 50 लाखांचा मुद्देमाल नष्ट

दिवा खाडीमध्ये अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई कारवाईत अंदाजे 50 लाखांचा मुद्देमाल नष्ट

ठाणे, प्रतिनिधी:- मुंब्रा खाडी परिसरात रेल्वे पुलालगत अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली. त्यानुषंगाने ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील तसेच ठाणे तहसिलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दि.25 मे 2025 रोजी मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळील खाडी परिसरात गस्त घालण्याची कार्यवाही राबविली.

या गस्त दरम्यान दिवा खाडीमध्ये एक बोट (बार्ज) आणि सक्शन पंपच्या सहाय्याने अवैध रेती उत्खनन होत असल्याचे आढळून आले. महसूल विभागाच्या पथकाने तत्काळ हस्तक्षेप करीत बार्ज व सक्शन पंप खाडीमध्येच बुडवून नष्ट केले. नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 50 लाख रुपये इतकी आहे.

या कारवाईमुळे खाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर आळा बसणार असून पुढील काळातही अशी कारवाई सातत्याने सुरू ठेवली जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या कारवाईत बाळकुम मंडळ अधिकारी शशिकांत जगताप व त्यांचे सर्व ग्राम महसूल अधिकारीही सहभागी झाले होते.

00000

संबंधित पोस्ट

सोलापूर जिल्ह्यातील शेलगाव येथेकेळी संशोधन केंद्र उभारण्याबाबत शासन सकारात्मक- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाट

आपत्कालिन वाहनांना रस्त्यावर प्रवास करताना,वाहनधारकांनी मार्गिका उपलब्ध करून द्यावी- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे- आपत्कालिन वाहनांना अडथळा निर्माण झाल्यास 10 हजार रूपये दंडाची तरतूद…

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :मुंबईतील अनधिकृत बांधकामांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी- उद्योग मंत्री उदय सामंत

शासनाच्या १०२७ सेवा १५ ऑगस्टपासूनएकाच पोर्टलवरून- संजय काटकर

गणपती बाप्पा मोरया !! जीएसबी सेवा मंडळाने मिळवले २०२५ च्या गणेशोत्सवासाठी ४७४.६४ कोटी रुपयांचा विमा…

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta