vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश -त्यानुसार महानगरपालिकेच्या तिन्ही रूग्णालयात राखीव बेड्सची व्यवस्था…

कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश -त्यानुसार महानगरपालिकेच्या तिन्ही रूग्णालयात राखीव बेड्सची व्यवस्था…

 

        नवी मुंबई प्रतिनिधी- सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये कोव्हीड -19 संसर्गीत रुग्ण आढळून येत आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोव्हीड – 19 पूर्वतयारीच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे आणि इतर वैद्यकीय अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन कोव्हीड – 19 संसर्गाच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या व सज्ज राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

त्यामध्ये कोव्हीड – 19 चाचणी Rat-RtPCR करणे, पुरेशा प्रमाणात औषधे, सर्जिकल साहित्य, पीपीई किट, ऑक्सिजन, ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून घेणेच्या दृष्टीने कार्यवाही करणे, रुग्णालय स्तरावर आवश्यक कक्ष स्थापन करणे, बेड्स उपलब्ध करून देणे अशी अनुषांगिक पूर्वतयारी तातडीने करून घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना तत्पर राहणेबाबत निर्देशित करून त्याबाबतची जबाबदारी सर्व संबधितांस देण्यात याव्यात असे सूचित केले आहे. कोव्हिड – 19 च्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेणेबाबत नागरिकांमध्येही विविध माध्यमांतून जागरूकता निर्माण करण्याची कार्यवाही करण्याचेही आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने तत्पर कार्यवाहीस सुरूवात केलेली आहे.

    नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोव्हिडबाबत आवश्यक दक्षता घेण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता व्यक्तिगत स्वच्छतेविषयी काळजी घ्यावी व नाहक भीतीचे वातावरण पसरवू नये. मात्र सर्दी, खोकला, फ्ल्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा तसेच वैद्यकिय सल्ला घ्यावा आणि आपल्या नजिकच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेच्या १०० शाळांमध्ये वॉटर फिल्टर बसविणार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा.पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी

vishwatmaklokswamivarta

1962 हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

vishwatmaklokswamivarta

एआय’ च्या युगात जबाबदार पत्रकारितेचा नवा दृष्टिकोन घडवा- अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा

vishwatmaklokswamivarta

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधीn- सरन्यायाधीश भूषण गवई मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव.