vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती व स्व गुणाबाई गाडेकर पन्नासावा स्मृतिदिन निमित्त आयुर्वेद मोफत शिबिर धारावी संपन्न

 अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती व स्व गुणाबाई गाडेकर पन्नासावा स्मृतिदिन निमित्त आयुर्वेद मोफत शिबिर धारावी संपन्न

मुंबई प्रतिनिधी- अहिल्याबाई होळकर श्री शताब्दी जयंती व स्वर्गीय गुणाबाई रा गाडेकर पन्नासव्या स्मृतिदिनानिमित्त हराळे समाज सेवा संघाच्या वतीने विभागातील 40 वर्षावरील महिला व पुरुषांसाठी मोफत आयुर्वेदिक उपचार तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन समाज मंदिर हॉल सकीना बाईचा मेन रोड धारावी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते

सदर कार्यक्रम भारत सरकार केंद्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्था पोद्दार रुग्णालय वरळी मुंबई आयुष मंत्रालय यांच्या माध्यमातून घेण्यात आले होते सकाळी नऊ ते दोन पर्यंत 102 लोकांनी या आयुर्वेदिक शिबिराचा लाभ घेतला यामध्ये वजन तपासणी रक्तदाब हिमोग्लोबिन आरोग्य तपासणी वैद्यकीय औषधे मसाज तेल ह्या सुविधा विनामूल्य देण्यात आल्या यावेळी डॉक्टर दत्तात्रय दिघे डॉ नेहा माळी डॉ शितल आनंदराव डॉ धनश्री देवधरे व त्यांचे सहकारी श्री वैभव तळेगावकर श्री प्रताप पिलाटे व श्री शेख या मंडळींनी रुग्ण तपासणी उपचार मार्गदर्शन व मोफत आयुर्वेदिक औषध देऊन सेवा दिली

यावेळी संघाचे कार्याध्यक्ष श्री दिलीप गाडेकर अध्यक्ष श्री शंकर बळी मुख्य सचिव श्री सुनील पवार श्री गणेश शिर्के यांच्यासह श्रीम आरती माने अलका साबळे शोभा शिंदे तसेच किशोर जाधव अशोक काळे या सर्वांचे सहकार्य लाभले कार्यक्रमानंतर कार्याध्यक्ष दिलीप गाडेकर पोद्दार हॉस्पिटल डॉक्टर टीमचे आभार मानले तर शंकर बळी सर्व व्यवस्था पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले असल्याची समाजसेवक माहिती दिलीप गाडेकर यांनी दिली

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह ८ ते १४ एप्रिल दरम्यान साजरा होणार सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांची माहिती

जिल्ह्यातील ५० शिवप्रेमी ‘भारत गौरव यात्रा’साठी रवाना; छत्रपती शिवाजी महाराज सर्किटमध्ये होणार सहभागी

प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका उदयगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

लोणार नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीरा मापारी विजयी

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिका चुनाव 2025-26- सायन विधानसभा क्षेत्रातील-राजकीय पक्षनिहाय विजयी संख्या व मिळालेली वैध मते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोकन्यायालयात तडजोडीने 1 हजार 104 प्रकरणे निकाली 

vishwatmaklokswamivarta