vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

संसर्गजन्य आजारांबाबत खबरदारी बाळगा- जिल्हाधिकारी स्वामी

संसर्गजन्य आजारांबाबत खबरदारी बाळगा- जिल्हाधिकारी स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी

अवकाळी झालेला पाऊस, तापमानातील चढ उतार आणि त्यातच लवकरच येऊ घातलेला पावसाळा अशा परिस्थितीत जिल्ह्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. ग्रामिण व शहरी भागातील आरोग्य यंत्रणांनी सज्ज राहून लोकांचे आरोग्य विषयक प्रबोधन करावे व संसर्गजन्य आजारांबाबत खबरदारी बाळगावी,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

 जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांचा आढावा आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, जिल्हा नियोजन अधिकरी भारत वायाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे, घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश हरबडे, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. विशाल बेंद्रे आदी यावेळी उपस्थित होते.

वातावरणातील बदल पाहता जिल्ह्यात संसर्गित आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच राज्यात कोविडच्या रुग्णांची संख्याही आढळून येत आहे. काल (दि.२) पर्यंत जिल्ह्यात कोविडच्या ३८४ चाचण्या होऊन ८ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यापार्श्वभुमिवर जिल्ह्यात खबरदारी बाळगण्याच्या सुचना शासनाकडून प्रशासनास प्राप्त झाल्या आहेत.त्यानुसार जिल्ह्यात कोविड सदृष्य लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणे, वृद्ध व सहव्याधी असलेल्या लोकांची अधिक काळजी घेणे याबाबत नागरिकांना जागरुक करावे. श्वसन संस्थेशी संबंधित आजारांच्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या दृष्टीने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांनी सतर्क रहावे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये मात्र खबरदारी बाळगावी,असेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

अतिवृष्टी अनुदान वितरणात सुलभता येण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी,आवश्यक; शनिवार(दि.८), रविवार(दि.९) प्रत्येक गावात विशेष कॅम्प

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यकØ राज्य निवडणूक आयोगाचे आदेश जारीØ जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत…

vishwatmaklokswamivarta

एक दिवा सैनिकांसाठी – दिवाळी सकाळ सैनिकांच्या परिवारासोबत उपक्रम उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

आयुष्मान आरोग्य मंदिर आणि राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत 10.18 कोटी महिलांची गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी

लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी, विना परवानगी आंदोलन किंवा हिंसा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा.

शिऊर बंगला ते नांदगाव रस्त्याच्या कामाचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते भुमिपूजन…

vishwatmaklokswamivarta