vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता**ग्रीन मॅरेथॉनव्दारे नेरूळ विभागात पर्यावरण संवर्धन संदेशाचे प्रसारण

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता**ग्रीन मॅरेथॉनव्दारे नेरूळ विभागात पर्यावरण संवर्धन संदेशाचे प्रसारण*

 

   नवी मुंबई प्रतिनिधी -जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डी.वाय.पाटील क्लायमेट ॲक्शन लॅबच्या वतीने आयोजित ‘ग्रीन मॅरेथॉन : रन फॉर द प्लॅनेट’ या पर्यावरणपूरक उपक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेने आयोजन सहभाग घेत हा उपक्रम यशस्वी केला. महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक कच-याचे निर्मूलन’ या जागतिक पर्यावरणदिनाच्या संकल्पेनेला अनुसरून पर्यावरण सप्ताह साजरा केला जात आहे. या अंतर्गत नानाविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून त्यामध्ये लोकसहभागावर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे विविध संस्थांमार्फत आयोजित पर्यावरणशील उपक्रमांतही महानगरपालिका सहभागी होत आहे.

   आज डॉ.डी.वाय.पाटील समुहाचे अध्यक्ष श्री.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार डी.वाय.पाटील क्लायमेट ॲक्शन लॅबमार्फत डॉ.डी.वाय.पाटील स्टेडिअमपासून सुरू झालेल्या व नेरूळ पूर्व परिसरात निश्चित केलेल्या मार्गाने पुन्हा स्टेडिअमजवळ सांगता झालेल्या 5 किमी. अंतराच्या ग्रीन मॅरेथॉनमध्ये युवक, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महानगरपालिकेच्या वतीने उद्यान विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, विजय पाटील स्कुल ऑफ मॅनेजमेंटच्या कॉर्पोरेट रिलेशन मॅनेजर डॉ.विद्या श्रीनिवास यांनी झेंडा दाखवून ग्रीन मॅरेथॉनचा शुभारंभ केला. नेरूळ विभागाचे सहा. आयुक्त श्री.जयंत जावडेकर यांनी ग्रीन मॅरेथॉनमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.    ‘पर्यावरण विघातक प्लास्टिकला नकार आणि कापडी पिशव्यांचा करू स्विकार’, ‘से नो टू प्लास्टिक’, ‘प्लास्टिकचा वापर टाळूया – पर्यावरण जपूया’ अशा घोषवाक्यांचे फलक उंचावत या ग्रीन मॅरेथॉनमध्ये 200 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये युवक-युवतींची संख्या लक्षणीय होती. या ग्रीन मॅरेथॉनमधील विजेत्यांना सन्मानचिन्हे व मेडल्स देऊन गौरविण्यात आले. या माध्यमातून शाश्वत पर्यावरण विकासासाठी एक यशस्वी धाव घेण्यात आली.

संबंधित पोस्ट

गरजू दिव्यांग व्यक्तींनी स्वावलंबी होण्याच्या योजनेचा-लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे २८ वर्षे मुदतीचे८०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

किनगाव राजाची लखन-दुर्गा ठरली रांजणी केसरीचे मानकरी*बैलजोडी मालाकला सतीश घाटगेकडून मिळाली दुचाकी भेट

vishwatmaklokswamivarta

भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार मा.रविंद्रजी चव्हाण जालन्यात-भाजपाचा संवाद मेळावा; सर्वांनी उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

मुंबई वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील सर्वात मोठी कारवाई. शाकुलशहा दर्गा परिसरातून २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींसह एकूण २५ बांगलादेशी घुसखोरांना अटक…

पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती

vishwatmaklokswamivarta