vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई येथे 30 जून रोजी डाक अदालत

मुंबई येथे 30 जून रोजी डाक अदालत

        सांगली, प्रतिनिधी : भारतीय डाक विभागाची सर्कल स्तरावरील डाक अदालत दि. 30 जून 2025 रोजी दुपारी 4 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. तक्रारी स्वीकारण्याची अंतिम दिनांक 20 जून आहे, असे प्रवर डाक अधिक्षक सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

     महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव व हुद्दा याचा स्पष्ट उल्लेख करून तक्रार दिनांक 20 जूनपर्यंत पोहोचेल अशा रितीने सहायक निदेशक डाक सेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई अनेक्स बिल्डिंग, जी.पी.ओ. इमारत, चौथा माळा, मुंबई-400001 यांच्या नावे दोन प्रतीसह पाठवावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा‘एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण

कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी चालत जाणा-या भाविकांसाठी मराठी, तेलगु आणि कन्नड भाषेमध्ये शासकीय योजंनाची माहिती देणाऱ्या मल्टिमीडिया प्रदर्शनाचे आयोजन

इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; रेडक्रॉस सोसायटी होणार सामाजिक सेवेचा वटवृक्ष – डॉ. किरण पाटील 

vishwatmaklokswamivarta

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयोजित मोर्चात बौध्दांनी ताकद दाखवावी -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर