vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये- ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम

पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये- ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, प्रतिनिधी- कोकणात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे नदी – नाल्यांना पूर येऊन गावांचा संपर्क तुटतो. गावांचा संपर्क राहण्यासाठी साकवची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात कोकणात अस्तित्वातील साकव दुरुस्त करून कुठेही साकव दुरुस्ती अभावी गावांचा संपर्क तुटता कामा नये, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्या.कोकणातील साकव निर्मिती, दुरुस्ती बाबत बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना राज्यमंत्री श्री. कदम बोलत होते. बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तर दूरदृष्य प्रणालीद्वारे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, पाणंद रस्त्याप्रमाणे साकव निर्मिती व दुरुस्तीसाठी कोकण विभागाचा आराखडा तयार करण्यात करून राज्यस्तरीय नवीन लेखाशीर्ष निर्माण करावे. कोकणात आवश्यकतेनुसार नवीन साकव निर्मिती, दुरुस्तीसाठी आराखडा तयार करावा. यासाठी गावनिहाय माहिती घेण्यात यावी.

कोकणात अस्तित्वातील साकवांची उंची वाढवून पुलात रूपांतर करण्यासाठी आराखड्यात समावेश करावा. साकव दुरुस्ती आणि निर्मितीचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी दिल्या.

0000

 

नीलेश तायडे/विसंअ/

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत परिपूर्ण अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

अंबरनाथमध्ये बंधबिगार कामगारांची सुटकानाल्सा (National Legal Services Authority) योजनेंतर्गत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विशेष पथकाने केली धडक कारवाई

vishwatmaklokswamivarta

ग्रामस्थांच्या तक्रारी, अडचणी निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पंचायत समितींना दिली भेटब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी मार्फत ग्रामस्थांच्या अडचणीं सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार…

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा #पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

31 मार्चला कोरडा दिवस जाहीर

सांगली पॅटर्न ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे सांगली जिल्हा समृध्द करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन- सांगली पॅटर्न कृषि परिषद निर्यात सक्षमीकरण कार्यशाळेस उत्कृष्ट प्रतिसाद