vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठीकृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी “संरक्षित शेती” करण्यासाठीकृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा

ठाणे, प्रतिनिधी- वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पीकास पोषक वातावरण निर्मिती करुन उच्च दर्जाचा भाजीपाला व फुलपिके घेण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. हरितगृह व शेडनेटगृहाच्या वापरामुळे फुले व भाजीपाला पिकांचे निर्यात योग्य गुणवत्तेच्या मालाचे उत्पादन होत असून त्यापासून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये खुल्या वातावरणाच्या तुलनेत 3 ते 4 पटीने उत्पादन घेता येते. त्यामुळे हरितगृह व शेडनेटगृह उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून संरक्षित शेतीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

लाभाच्या योजना:-· एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान· राष्ट्रीय कृषी विकास योजनाखर्चाचा मापदंड, अनुदान मर्यादा व क्षेत्र मर्यादा:-बाब – हरितगृह (OVPH), प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.1000 ते 1200. अपेक्षित खर्च – 5 गुंठे – 6.0 लाख, 10 गुंठे – 10.58 लाख, 20 गुंठे – 20.80 लाख, 25 गुंठे – 25.00 लाख. 50% देय अनुदान – 5 गुंठे – 3.0 लाख, 10 गुंठे – 5.38 लाख, 20 गुंठे – 10.40 लाख, 25 गुंठे – 12.50 लाख. क्षेत्र मर्यादा – 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी.

बाब – हरितगृह (CCPH), प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.1500 ते 1800. अपेक्षित खर्च – 5 गुंठे – 9.0 लाख, 10 गुंठे – 16.12 लाख, 20 गुंठे – 31.20 लाख, 25 गुंठे – 37.50 लाख. 50% देय अनुदान – 5 गुंठे – 4.50 लाख, 10गुंठे – 8.06 लाख, 20 गुंठे – 15.60 लाख, 25 गुंठे – 18.75 लाख. क्षेत्र मर्यादा – 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी.

बाब – शेडनेटगृह, प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.710, अपेक्षित खर्च – 5 गुंठे – 3.55 लाख, 10 गुंठे – 7.18 लाख, 20 गुंठे – 14.76 लाख, 25 गुंठे -17.75 लाख. 50% देय अनुदान – 5 गुंठे – 1.77 लाख, 10 गुंठे – 3.59 लाख, 20 गुंठे – 7.38 लाख, 25 गुंठे – 8.87 लाख. क्षेत्र मर्यादा – 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी.

बाब – प्लास्टिक मल्चिंग, प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.4.0. अपेक्षित खर्च – 40000 प्रति हेक्टर. 50% देय अनुदान – 20000 प्रति हेक्टर. क्षेत्र मर्यादा – जास्तीत जास्त 2 हेक्टर.

नव्याने समाविष्ट घटक:-बाब – फळ पिकांकरिता फळांना/फळांच्या घडांना कव्हर (Fruit Cover & Crop Cover), प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.5. अपेक्षित खर्च – रु.50000/. 50% देय अनुदान – रु. 25000/. क्षेत्र मर्यादा – जास्तीत जास्त 2 हेक्टर.बाब – तण नियंत्रक अच्छादन (Weed Mat), प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड -रु.50.00. अपेक्षित खर्च – रु. 200000/ एकर. 50% देय अनुदान – 100000/एकर. क्षेत्र मर्यादा – जास्तीत जास्त 4000 चौ.मी.

बाब – हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स, प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड – रु.350. अपेक्षित खर्च – रु.350000/10 गुंठे. 50% देय अनुदान – रु.175000/ 10 गुंठे. क्षेत्र मर्यादा – जास्तीत जास्त 1000 चौ.मी.

अनुसुचित क्षेत्रासाठी 15 टक्के अतिरिक्त खर्चाचा मापदंड देय आहे.शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे http://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळ अथवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.अग्रीस्टॅक फार्मर आय डी, 7/12 उतारा, 8-अ, आधार कार्डाची छायांकीत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी), विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतुःसीमा नकाशा ही कागदपत्रे आवश्यक आहेत, असे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि ओषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के.पी.मोते यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

मुंबईतील गोवंडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते

vishwatmaklokswamivarta

मुंबई झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावीतर्फे आरती संग्रहाचे वाटप!

महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’साठी अर्ज आमंत्रितअर्ज स्वीकारण्यास 1 एप्रिल 2025 पासून सुरुवात, अंतिम मुदत 31 जुलै 2025

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे-जल जीवन मिशन अंतर्गत योजनेतील प्रगतीपथावरील कामे लवकरात लवकर पूर्ण करणार-पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी नियोजनभवनात संवादसातत्यपूर्ण संवादासाठी जिल्हा प्रशासनाचा उपक्रम,प्रत्येक अडचण सोडवून योजनांचा लाभ मिळवून देणारजिल्हाधिकारी वर्षा मीना

vishwatmaklokswamivarta

इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव