vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मौजे कुंभरोशी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” संपन्न..

मौजे कुंभरोशी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” संपन्न..

सातारा प्रतिनिधी : महाबळेश्वर मंडलातील मौजे कुंभरोशी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” शिबीर राबविण्यात आल्याची माहिती महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी दिली.

 महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महूसल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी मंडळ स्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीरामध्ये “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” बाबत माहिती व शिबीरामध्ये शासनाच्या निर्देशाप्रमाणे पुढीलप्रमाणे दाखले व इतर सेवा पुरविण्यात आल्या असल्याची माहिती तहसिलदार श्रीमती तेजस्विनी पाटील यांनी दिली. 7/12, खाते उतारे व फेरफार नक्कल वाटप संख्या: -42, तहसिल कार्यालय व ग्राम महसूल अधिकारी यांचे मार्फत रहिवासी दाखले वाटप संख्या:-172, तहसिल कार्यालय व ग्राम महसूल अधिकारी यांचे मार्फत उत्पन्नाचे दाखले वाटप संख्या:- 113, दुबार शिधापत्रिका वाटप संख्या:- 178, ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत शासकीय येणे बाकी दाखला वाटप संख्या: 54, संजय गांधी निराधार सर्व योजनांची माहिती देवून अर्ज प्राप्त करुन घेण्यात आले, पीएम किसान योजना व शेतकरी नोंदणी संच बाबत नोंदी घेण्यात आल्या व पीएम किसान योजनेच्या,अनुषंगाने अडीअडचणी दूर केल्या, मयत वारस नोंदीबाबत कामकाज केले.

तहसिलदार श्रीमती तेजस्विनी पाटील यांच्याहस्ते दाखले व शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. तसेच स्थानिक अडीअडचणीचे निवारण केले. सदर शिबीर कार्यक्रमामध्ये कुंभरोशी भागातील नजीकच्या गावातील शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तहसिल कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच मंडलाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी कामकाज केले

0 0 0 0

संबंधित पोस्ट

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावासाठी टँकर मंजूर

देवणी येथे 2 एप्रिल रोजी महादेव यात्रेनिमित्तपशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालखी महामार्गाची पाहणी

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या डिजिटल डॅशबोर्डचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न क्रीडा क्षेत्राशी निगडित प्रश्न मार्गी लावण्याकरीता राज्य शासनाचा सकारात्मक प्रयत्न – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 अल्पवयीन मुलांनी अश्लील VIDEO दाखवत केले मुलीवर अत्याचार…