vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 अल्पवयीन मुलांनी अश्लील VIDEO दाखवत केले मुलीवर अत्याचार…

मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 अल्पवयीन मुलांनी अश्लील VIDEO दाखवत केले मुलीवर अत्याचार…

मुंबई प्रतिनिधी-मुंबईत काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला.

देशाची आर्थिक राजधानी आणि भारतातील सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेल्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला. एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी मिळून सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला.

प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील काळाचौकी परिसरात ही घटना घडली आहे. या मुलीचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करण्यात आले होते. हे व्हिडीओ दाखवून या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यात आलं. या ब्लॅकमेलिंगला बळी पडल्यामुळे पाच जणांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे अत्याचार करणारी पाचही मुले ही अल्पवयीन आहेत. काळाचौकी पोलिसांनी मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या पाचही जणांना ताब्यात घेतलं आहे. या पाचही मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचही आरोपी अल्पवयीन

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करणारे पाचही जण अल्पवयीन आहेत. ज्यांनी हे घृणास्पद कृत्य केले. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी वाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काळाचौकी पोलिसांनी तातडीने कारवाई करत या पाचही मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिस कारवाईमुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर काळाचौकी पोलिसांनी लगेच दखल घेतली.

पोलिसांनी पाचही अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणात संरक्षण बालकांपासून लैंगिक अत्याचार कायदा (POCSO Act) आणि इतर संबंधित कायद्यांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिस तपास सुरू असून, या मुलांनी व्हिडीओ चित्रीकरण आणि ब्लॅकमेलिंगचा कट कसा रचला याचा शोध घेण्यात येत आहे.

ही घटना मुंबईच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर आणखी खुलासे समोर येण्याची शक्यता आहे

000000

संबंधित पोस्ट

माफसूच्या विकसित कृषी संकल्प अभियानास राज्यभर उत्कृष्ट प्रतिसाद…

बॉक्सिंग चॅम्पियन पद्मविभूषण मेरी कोम यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न..

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत

vishwatmaklokswamivarta

नांदेड शहरात 15 व 16 जानेवारीला भरणारे आठवडी बाजार राहणार बंद

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार· जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

पं. चंद्रकांत लिमये यांना आदरांजली अर्पण करणारा कार्यक्रम १७ जुलै रोजी पु.ल कट्ट्यावर