vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भाजपा आमदार तामिळ सेलवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भाजपा आमदार तामिळ सेलवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी | सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भाजपा आमदार तामिळ सेलवन यांच्या नेतृत्वाखाली  भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. “घराघर तिरंगा, प्रत्येक हृदय हिंदुस्तानी” या घोषणांनी दुमदुमलेल्या या यात्रेची सुरुवात विजय नगर, आंबेडकर नगर आणि म्हाडा चाळ येथून झाली. यात्रा एमजीआर चौक मार्गे आमदारांच्या कार्यालयात पोहोचली, त्यानंतर मक्कावाडी जंक्शन, कोळीवाडा जंक्शन, हनुमान मंदिर, सायन हॉस्पिटल जंक्शन, गांधी मार्केट आणि माटुंगा सर्कल मार्गे पुढे जात पूर्ण झाली.

या तिरंगा यात्रेत भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष रवि राजा, मंडळ अध्यक्ष, सर्व वार्ड अध्यक्ष, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले. हातात तिरंगा लहरवत “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम”च्या घोषणा देत वातावरण देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या रंगात रंगले होते.

संबंधित पोस्ट

जिल्हा विद्युत समितीची बैठक-वितरण सुधारणा व वितरण हानी कमी करण्याच्यायोजनांना प्राधान्य द्यावे-खा.संदिपान भुमरे

श्रीक्षेत्र चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य जयंती महोत्सव*

जनतेला शासकीय सेवांचा लाभ वेळेत मिळेल याची खबरदारी घ्या – मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नोंदणी व मुद्रांक यासाठी स्वतंत्र विवाद निवारण प्राधिकरण स्थापन होणार नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांची घोषणा 

दि.22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.जिल्हा न्यायालय ; तालुका न्यायालयांमध्ये होणार आयोजन 

vishwatmaklokswamivarta