vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भिवंडी येथील मुलांमुलींचे शासकीय वसतिगृह येथे रिक्त जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु

भिवंडी येथील मुलांमुलींचे शासकीय वसतिगृह येथे रिक्त जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु

ठाणे, प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय विभाग, मंत्रालय मुंबई अंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुलांमुलीचे शासकीय वसतिगृहात इयता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व महाविद्यालयीन विभागातील प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहात रिक्त असणाऱ्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु आहे. वसतिगृह प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://hms.mahait.org या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना भरता येतील. हे पोर्टल दि.11 जून 2025 पासून सुरु होणार आहे.

अर्जासोबत लागणारी प्रमाणपत्रे (अपलोड करावयाची कागदपत्रे):- गुणपत्रिका, टि.सी., जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी), उत्पन्नाचा दाखला (रु.2 लाखा 50 हजाराच्या आत प्राधिकारी), रहिवासी दाखला (सरपंच/तलाठी/नगरसेवक), आधार कार्ड, शाळा / महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र अथवा प्रवेश पावती, आधार संलग्न बँकखाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो. या ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आलेल्या प्रवेश अर्जाची छांयाकीत प्रत गृहपाल, मागासवर्गीय मुलांमुलीचे शासकीय वसतिगृह मानसरावर शॉपींग कॉम्पलेक्स पहिला व दुसरा माळा, भिवंडी येथे जमा करण्यात यावी. अधिक माहितीकरिता प्र.ना मडावी गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा मो. क्रमांक ९७६७६१२८९७/८७९३५८७७२१.

शासन निर्णय २६ जुलै २०११ अन्वये विनामुल्य देय सोई सुविधा:- दोन वेळेचे पोटभर जेवण, सकाळी नाश्ता / दुध / फळे 2 अंडी, शैक्षणिक साहित्याकरिता नियमानुसार डिबीटीव्दारे देय रक्कमा शैक्षणिक स्टेशनरी प्रती वर्ष 4 हजार, गणवेश रु. 1 हजार शालेय, रु.2 हजार महाविद्यालयीन (ड्रेस कोड लागु असल्यास), शैक्षणिक सहल रु. 2 हजार प्रती वर्ष, प्रती प्रकल्प रु. 1 हजार, दरमाह रु.500/- निर्वाह भत्ता, उपलब्ध सोई सुविधा:- सुसज्य संगणक कक्ष, ग्रथांलय सुविधा, मनोरंजनाकरिता टीव्ही, क्रीडा साहित्य, दैनंदिन वर्तमानपत्रे 5 व स्पर्धात्मक परिक्षेकरिता स्पर्धा परिक्षा मासिके पुरविण्यात येतात, असे मागासवर्गीय मुलांमुलीचे शासकीय वसतिगृह, भिवंडी जि.ठाणे गृहपाल प्र.ना मडावी यांनी कळविले आहे

00000

 

संबंधित पोस्ट

सुरक्षित ऑनलाईन आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांची सतर्कता गरजेची – सहायक महाव्यवस्थापक पंकज बच्छाव ‘आर्थिक व्यवहाराविषयी जनजागृती’ सत्राचे मंत्रालयात आयोजन

vishwatmaklokswamivarta

समाजकार्यात स्वतःला वाहून नेणाऱ्या माय माऊलीच्या आईच्या जागी बहिणीची व आजीची माया देणाऱ्या कल्पना शिंदे यांचा15 मे 2026 रोजी जागतिक कौटुंबिक निमित्ताने  माऊलीचा नातेवाईक स्थानिक रहिवाशी व कुटुंबीयांकडून सन्मान..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जेन ओ  पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स’ या कार्यक्रमाचे उद्घाटन

जिल्ह्यात दि.10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

नव्या मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणाला सामोरे जाताना स्वच्छता अधिकारी, कर्मचारी यांची क्षमतावृध्दी कार्यशाळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

वर्धा जिल्ह्यात पावसामुळे पडझड – अनेक कुटुंबे बेघर