vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन.ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन…

 ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन…

प्रतिनिधी : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार  यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. हिंदुजा रूग्णालयात दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. दिलीप कुमार यांची तब्बेत गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होती. हिंदुजा रूग्णालयातच त्यांना याआधी दाखल करण्यात आलं होतं. सकाळी साडे सात वाजता दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिलीप कुमार यांच्यासोबत सायरा बानो देखील रूग्णालयात होत्या. दिलीप कुमार यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत पत्नी सायरा बानो त्यांच्यासोबत होत्या. सायरा बानो यांनी याआधी अनेकदा दिलीप कुमार यांच्या प्रकृतीसाठी चाहत्यांना प्रार्थना करण्यास सांगितलं.

दिलीप कुमार यांना 29 जून रोजी हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिलीप कुमार यांना गेल्या काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. दिलीप कुमार यांचं निधन हा संपूर्ण सिनेसृष्टीसाठी मोठा धक्का आहे. गेल्यावर्षी दिलीप कुमार यांनी आपल्या दोन भावांना गमावलं आहे. 88 वर्षांचे असलम खान आणि 90 वर्षांचे एहसान खान यांच कोरोनामुळे निधन झालं होतं. यामुळे दिलीप कुमार यांना आपला वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस देखील साजरा केला नव्हता.

संबंधित पोस्ट

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’, संजय राऊत यांची राज्यपालांकडे मागणी

जळगाव येथे लखपती दीदी संमेलनाचे आयोजन,आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विकसित भारत संकल्प यात्रा’ मोहीम यशस्वी करण्यासाठी नियोजन करा;योजनाचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

vishwatmaklokswamivarta

राज्यपाल केंद्र सरकारचे एजेंट असतात. पण, राज्यपाल राज्याच्या अधिकारांवर कॅबिनेटवर अतिक्रमण, संजय राऊत शिवसेना नेते.

कालीचरण महाराज पुन्हा अडचणीत वाढ; पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल…

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामधल्या २० जणांवर ८१ लाख रुपयांचं इनाम जाहीर होतं.