vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने… जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विराेधात जाेरदार निदर्शने.

आमदारांचे निलंबन; भाजपची जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विराेधात जाेरदार निदर्शने करण्यात आली…

… प्रतिनिधी अकोला ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या गदाराेळामुळे विधानसभेत भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विराेधात जाेरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काही काळ रस्ता बंद करण्यात येऊन विराेधात नारेबाजी करण्यात आली.

 

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणावरून तिढा निर्माण झाला आहे. आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष करतच राहू, असा इशारा याप्रसंगी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिला. पावसाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाचा आवाज दाबण्यासाठी सरकारने १२ आमदारांचे निलंबन करणे ही लाेकशाहीची मूल्ये पायदळी तुडविण्यासारखे असल्याची टीका अग्रवाल यांनी केली. आंदाेलनात महापौर अर्चना मसने, गीतांजली शेगोकार, वैशाली शेळके, माधव मानकर, अंबादास उमाळे, किशाेर मांगटे पाटील, राहुल देशमुख, विजय इंगळे, अजय शर्मा, विनाेद मापारी, सुनीता अग्रवाल, रश्मी अवचार, नीलेश नीनोरे, सिद्धार्थ शर्मा, गिरीश जोशी, पवन पाडिया, निकिता देशमुख, विलास शेळके, अक्षय जोशी, अतुल अग्रवाल, हरिभाऊ काळे, बाळू सोनवणे, उकंडराव सोनवणे, प्रशांत अवचार, सुजित ठाकूर, जान्हवी डोंगरे, विजय परमार, रंजना विंचनकर, संजय बडाेणे, पल्लवी मोरे यांसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित हाेते.

संबंधित पोस्ट

विशेष लेखः-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 :उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांना मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी..

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई-26 लाखाचा मुद्देमाल जप्त…

vishwatmaklokswamivarta

केंद्र सरकारनं कोकण रेल्वेला 380 कोटी रुपयांची मदत जाहीर केल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची लोकसभेत माहिती

विद्यार्थ्यांची मोठी बातमी, दहावीचा निकाल लागला … राज्याचा निकाल 99.95 टक्के तर कोकणचा 100 %,कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर.

लघु उद्योजकांनी “जिल्हा पुरस्कार 2024-25” करितादि.10 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत…