
दहावीच्या निकालाची मोठी बातमी, : दहावीचा निकाल लागला … राज्याचा निकाल 99.95 टक्के तर कोकणचा 100 %,कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर.
प्रतिनिधी पुणे – राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९९ .९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार



