vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेप्रदेशस्थानिक बातम्या

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई-विशेष मोहीमेमध्ये ३६ गुन्हयांसह ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई-विशेष मोहीमेमध्ये ३६ गुन्हयांसह ५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा प्रतिनिधी: राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दि. १० व ११ जुन २०२५ रोजी संपुर्ण जिल्हयात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये एकुण ३६ गुन्हयांची नोंद करण्यात आलेली असुन ३६ आरोपींसह हातभट्टी ३७१ लि. रसायन ८३५७ लि. देशी मद्य ११७.७२ लि. व विदेशी मद्य ३५.८२ लि. यासह एकुण ५ लक्ष ९८ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले.

    आयुक्त,रा.ऊ.शु.म.रा.मुंबई डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील, अधीक्षक, रा.ऊ. शु. बुलढाणा डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हात दि. १० व ११ जुन २०२५ रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली. मोहिमेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ईश्वर नारायण वाघ निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहरातील भीलवाडा,आंबेडकर नगर, कैकाळीपुरा या भागात अवैध हातभट्टीवर १२ वारस गुन्हे नोंदवुन १३३ लि हातभटटी व ३११४ लि रसायनासह एकुण १ लक्ष ६० हजार १७५ हजार रुपयांचा मुद्येमाल पकडण्यात आला. बोज्जावार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भ्.प. बुलढाणा यांनी भादोला, डोंगरखंडाळा या भागात अवैध मद्य विक्री ७ वारस गुन्हे नोंदवुन १३१ लि हातभट्टी व – ३३९२ लि रसायन व ४.३२ लि देशी व सह एकुण १ लक्ष ५६ हजार २८० रुपयांचा मुद्येमाल पकडण्यात आला. व्ही एम. पाटील निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खामगाव यांनी मनसगाव,शेगाव, देवधाबा मलकापुर या भागात अवैध हातभट्टी व मद्यविक्री ८ वारस गुन्हे नोंदवुन १०७ लि हातभटटी व १८५१ लि रसायन व ११.९७ लि देशी व सह एकुण १ लक्ष ५६ हजार ८० रुपयांचा मुद्येमाल पकडण्यात आला. रोकडे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चिखली व रोटे दु. नि. दे. राजा – १ व नयना देशमुख दु नि दे.राजा-२ व भगत यांनी चिखली, देउळगावराजा भागामध्ये अवैध मद्य विक्री ९ वारस गुन्हे नोंदवुन ६८.४० लि देशी व २५.९२ लि. विदेशी सह एकुण १ लक्ष २६ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल पकडण्यात आला.

पुढील काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन अवैध हातभट्टी केंद्रावर अशाच प्रकारे विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आपल्या परीसरात अवैध मद्य विक्री अथवा बनावट निर्मीती आढळल्यास या विभागास टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ वर किंवा व्हॉटसअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ कळवावे. तसेच बुलढाणा जिल्हयातील किरकोळ व ठोक विक्री मद्य अनुज्ञप्तीधारक यांच्या अनुज्ञप्तीमध्ये जर बनावट मद्य आढळुन आले तर त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. मद्य बाळगतांना, मद्य सेवन, मद्य वाहतुक करतांना किंवा आपले जागेचा वापर अवैध धाबा चालवीण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी,असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

०००००००

संबंधित पोस्ट

बँकेत दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी शुक्रवारी महामेळावा- अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ”माझा पैसा माझा अधिकार”- खातेदारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ।

शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकार्‍यांच्या बैठकीचे व नवनियुक्त जिल्हाप्रमुखांच्या सत्कारांचे आयोजन – जास्तीत-जास्त शिवसेना पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावेअंबड, बदनापूर, जालना विधानसभा कार्यक्षेत्रातील पदाधिकार्‍यांनी बैठकीला उपस्थित राहावे – शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वतीने आवाहन –

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

रोहा रेल्वे स्थानकावर दहा जलद व अतिजलद गाड्यांना थांबा-महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी इंदोर एक्स्प्रेसला दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे मिरज येथेआपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील

vishwatmaklokswamivarta