vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

16 जूनला महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव…

16 जूनला महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव…

 

         नवी मुंबई प्रतिनिधी-  महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या 12 मार्च 2025 रोजीच्या पत्रानुसार 100 शाळांना भेटी हा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या अनुषंगाने मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी हे यावर्षीच्या शालेय वर्ष आरंभाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच दि. 16 जून 2025 रोजी एकेक शाळेमध्ये भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

          याकरिता नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शाळांमध्ये कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. कोणत्या शाळांना कोणते अधिकारी भेट देतील याचे पूर्व नियोजन करण्यात आलेले असून शालेय स्तरावर मुख्याध्यापकांनाही याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

          नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताकरिता गुलाबाची फुले, चॉकलेट व्यवस्था तसेच रांगोळी सजावट, वर्ग सजावट करणे, शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन भरविणे, सेल्फी पॉईंट करणे, लेझीमच्या तालावर ढोलताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करणे अशा विविध प्रकारे हा शालेय आरंभ दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे.

          या अनुषंगाने महागनरपालिकेच्या प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छता झालेली असून वर्गसजावटीचेही काम सुरू आहे. सुट्टीच्या कालावधीत शाळेला आवश्यक रंगरंगोटीही करण्यात आलेली आहे. सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन सर्वांना शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत माहिती दिलेली आहे. मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करण्यात आलेले आहे.

          यादिवशी नवीन विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा संच दिला जाणार असून त्याकरिता पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचलेली आहेत. शाळांनी पाठ्यपुस्तकांवर शाळेचे शिक्के मारून ती वाटप करण्यासाठी तयार ठेवलेली आहेत. विद्यार्थ्यांचे औक्षणही केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांना कोणत्याही प्रकारचे दडपण वाटू नये व दडपण विरहित आनंददायी वातावरणामध्ये शाळेमध्ये त्यांनी पहिले पाऊल ठेवावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 शाळांमध्ये या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांच्या नियंत्रणाखाली नियोजन करण्यात आलेले आहे. मान्यवरांनी शाळेला भेटी दिल्यानंतर शाळा भेटीचा फॉर्म भरून ठेवण्याबाबतची तयारीही पूर्ण झालेली आहे. अशाप्रकारे 16 जून रोजी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाची सर्व यंत्रणा सुसज्ज आहे.

संबंधित पोस्ट

बुलढाणा जिल्ह्यात ‘जिवंत सातबारा मोहीम’ वारसांना सातबारावर नोंदणी करण्याची संधी १ ते ३१ मार्चपर्यंत कालबध्द कार्यक्रम चिखली तहसीलचा उपक्रम जिल्हास्तरावर

नीरा उजवा कालव्याच्या मजबुतीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

विधानपरिषद लक्षवेधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात कोणावरही अन्याय होणार नाही- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

विधानसभा प्रश्नोत्तर वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta