vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री आवास योजना; लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन…

प्रधानमंत्री आवास योजना; लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन…

 

बुलडाणा, प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वाढीव 13 लक्ष 66 हजार 767 घरकुले मंजूर होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या ड यादीनुसार घरकुलाची लक्षांक प्राप्त होणार आहे. प्राप्त लक्षांकानुसार आवास लस ड प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आपल्या ग्रामपंचायतीत सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात व प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी केले आहे.

 ग्रामपंचायत स्तरावर लाभर्थ्याकडून बँक पासबुक प्रत, आधार कार्ड, नमुना नंबर आठ, जॉब कार्ड, इ कागदपत्रे ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवाक व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्यामार्फत जमा करणे सुरु आहे. अद्यापर्यंत जिल्ह्यामध्ये आवास सॉफ्ट वरील कायस्वरुपी प्रतिक्षायादीतील शिल्लक 1 लक्ष 18 हजार 723 लाभार्थ्यांपैकी प्राप्त होणाऱ्या लक्षांक 41 हजार 315 (अंदाजे) पैकी 25 हजार 990 म्हणजे 62.91 टक्के लाभार्थ्यांचे आवास सॉफ्टवर नोंदणीची प्रक्रीया पुर्ण झाली आहे. अजूनही उर्वरीत 17 हजार 308 लाभार्थ्यांनी नोंदणी करणे बाकी आहे. या लाभार्थ्यांनी नमूद कागदपत्रे आपल्या ग्रामपंचायतींना सादर करणे आवश्यक आहे. कागदपत्रे जमा करुन केवळ लाभार्थ्यांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. शासनामार्फत जिल्हा लक्षांक प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करण्यात येणार आहे.00000000

संबंधित पोस्ट

कृषी यांत्रिकीकरणातून शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्रीचा लाभ देण्यासाठी शासन कटिबद्ध – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर जिल्ह्यात १००० अनुदानित ट्रॅक्टरचे वितरण; कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ

vishwatmaklokswamivarta

बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी

य युवा दिनानिमित्त अलिबागमध्ये अमली पदार्थमुक्त भारतासाठी भव्य रॅली व पथनाट्य कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम तयारीचा,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा..

मुंबई आणि ठाण्याला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!” हवामान विभागाने आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.