vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई नाही-परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई नाही-परिवहन आयुक्तांचे परिपत्रक

 

मुंबई, प्रतिनिध : वाहनांच्या पाठीमागे इतर वाहनांना कोणत्याही प्रकारे अडचण, अडथळा निर्माण होणार नाही, अशा प्रकारे बसविण्यात आलेल्या सायकल कॅरीअरद्वारे वाहून नेत असल्यास, अशा वाहनांवर यापुढे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे एक साधन त्याचप्रमाणे कोणत्याही भागाच्या शेवटच्या स्थानापर्यंत सहज जाता येते. याकरीता जगातील अनेक देशांमध्ये बरेचजण वाहनाचा वापर न करता सायकलचा वापर करत असतात, याकरीता बरेचसे वाहन धारक आपल्या वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून त्याचा वापर सायकल वाहून नेण्यासाठी करत असतात. आपल्या देशातही वाहनधारक वाहनाच्या पाठीमागे सायकल कॅरीअर बसवून सायकल वाहून नेताना आढळतात.

मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमात वाहनांच्या पाठीमागे सायकल कॅरीअर लावण्याबाबत कुठेही प्रतिबंध नाहीत, असे असतानादेखील अशा वाहनांवर परिवहन विभाग तसेच पोलीस विभाग यांच्या अंमलबजावणी पथकांमार्फत कारवाई केली जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यापुढे अशा सायकल कॅरीअरवर कुठलीही कारवाई होणार नाही, परिपत्रकात नमूद केल आहे.

००००

संबंधित पोस्ट

कराड येथील अपघात झालेल्या विद्यार्थ्यांवर कृष्णा हॉस्पीटल येथे उपचार सुरु

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सन २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्यासाठी कार्यक्रम जाहीर

vishwatmaklokswamivarta

सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार; कागदपत्रे सादर करण्याचे अकोट वन्यजीव विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता- विभागीय आयुक्तांची भेट घेऊन व्यक्त केले ऋणनिर्देश

vishwatmaklokswamivarta

राजा माने यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक यश डिजिटल मीडियाला मिळाली अखेर राजमान्यता  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे, ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे संघटनेने मानले आभार ..

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रीपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस