vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवसेना उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्याला यश अखेर ३५ वर्षांची प्रतिक्षा संपली : बस गावात येताच जागोजागी वाहक वचालकाचा सत्कार -माहोरा ते जालना सेवा अखेर सुरु

शिवसेना उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्या पाठपुराव्याला यश अखेर ३५ वर्षांची प्रतिक्षा संपली : बस गावात येताच जागोजागी वाहक वचालकाचा सत्कार -माहोरा ते जालना सेवा अखेर सुरु

जालना, (प्रतिनिधी)-जाफराबाद तालुक्यातील मोहारा ते जालना (मार्गे पिंपळगाव कड, बरंजळा साबळे, नळणी, बरड, नळणी चौफुली, समर्थनगर, नळणी,जवखेडा ठोंबरे, केदारखेडा, राजुर -जालना बस सेवा सुरू करण्यात यावी, यामागणीसाठी भोकरदन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी परिवहन महामंडळाकडे वारंवार मागणी व आंदोलने केली. अखेर यामागणीला यश आले असून परिवहन महामंडळाने दिलेल्या आश्वासनानुसार १६ जून सोमवारपासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे.सदरील बस सेवा सुरु करावी ही मागणी मागील ३५ वर्षांपासूनची होती. मात्र कोणीही पाठपुरावा करण्यास धजत नसल्याने मागणी पुर्ण होत नव्हती. मात्र जवखेडा ठोंबरे तरुण तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी मनात घेवून व शिवसेनेच्या वरिष्ठांच्या सहकार्याने बससेवा सुरु करण्यासाठीपाठपुरावा सुरु केला. वेळप्रसंगी आंदोलनेही केली. शेवटी मोठ्या परिश्रमानंतर आज १६ जुनपासून साक्षात बससेवा सुरु होवून बस गावात आली.त्यामुळे रस्त्याने येणार्‍या सर्व गावात बसचालक व वाहकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

सदरील बस सकाळी ८.५५ माहोरा ते जालना (मार्गे पिंपळगाव कड- बरंजळा साबळे-नळणी बरड- नळणी चौफुली- समर्थ नगर नळणी- जवखेडा ठोंबरे- केदारखेडा- राजुर जालना, दुपारी २.५५ जालना (संबंधित महामार्गावरून) ते माहोरा निघेल, अशी बसची वेळ आले. आज सदरील बस जवखेडा ठोंबरे गावात येताच शिवसेना उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्यासह सरपंच लक्ष्मण ठोंबरे, माजी सरपंच बाबुराव ठोंबरे, ग्रामसेवक व्ही. एस. सोनुने, शिवसेना विभागप्रमुख फारूक पठाण, युवासेना विभागप्रमुख विलास करतारे, परमेश्वर ढवळे, डॉ.भगवान ठोंबरे, दिनकर (फौजी),सुयोग ठोंबरे, बालाप्रसाद ठोंबरे, भगवान ठोंबरे,विलास करतारे, वाल्मीक ढवळे, नारायण ठोंबरे, अंकुश ठोंबरे, शिवाजी ठोंबरे, राजू ठोंबरे, भागवत ठोंबरे,नारायण ठोंबरे, अण्णा ठोंबरे, बबन ठोंबरे, सुनील ठोंबरे, शिवाजी ठोंबरे,संतोष ठोंबरे, शरद ठोंबरे, रामेश्वरठोंबरे, शेषराव ठोंबरे,जना ठोंबरे, बाबुराव ठोंबरे, गजानन ठोंबरे व इतर गावकरी उपस्थित होते.यावेळी एस टी बसचे वाहक एम. एस. राठोड, चालक बी. एफ. पगारे यांचा जवखेडा ठोंबरे गावात गावकर्‍यांनी एकत्रित येवून सत्कार केला.

०००००००००००

००फौटो ओळी…..३-जवखेडा ठोंबरे गावात एस टी बसचे वाहक एम. एस. राठोड, चालक बी. एफ.पगारे यांचा उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्यासह गावकर्‍यांनी एकत्रित येवून सत्कार केला.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत प्रक्रिया उद्योगांना मोठे अनुदान10 टन क्षमतेचे तेल काढणी युनिट, मिनी ऑईल मिल, 250 मे. टन गोदाम व कडधान्य प्रक्रिया-पॅकेजिंग युनिटसाठी अर्जाची मागणी,राष्ट्रीय खाद्यतेल अभियान व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

शिर्डीचे साईबाबा भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखड्या’ची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य सचिव राजेश अग्रवालसिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठक..

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद निवडणुकीला राज्यात सुरुवात 🗳️🇮🇳महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी सुरू झाली. 

vishwatmaklokswamivarta

विधानसभा निवेदन :महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन

विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील-घाट परिसरात 25-26 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज…विदर्भ (प्रामुख्याने पूर्व विदर्भ) आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ आणि नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta

मोर्शी उपविभागात ‘सेवा पंधरवाड्या’चे यशस्वी आयोजन