vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधानसभा निवेदन :महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन

विधानसभा निवेदन :महसूल मंडळ स्तरावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवेदन

 

 मुंबई, प्रतिनिधी महसूल विभाग अंतर्गत राज्यातील जनतेची दैनंदिन कामे पूर्ण करणे, महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यात यापुढे महसूल मंडळ स्तरावर महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, या अभियानाचे नामकरण श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण अंतर्गत महसूल मंडळ स्तरावर हे अभियान राबविण्यात येणार आहे. वर्षातील किमान चार वेळा मंडळस्तरावर अभियानाअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात येईल.

समाधान शिबिरांमध्ये जातीचे, उत्पन्न व रहिवासी दाखले, सातबारा, फेरफार, शिधापत्रिका वाटप, संजय गांधी निराधार योजना, महसूल विभागाच्या विविध सेवा, विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी लागणारे कागदपत्रे तसेच पीएम किसान आणि अन्य सामाजिक योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात येणार आहे. महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत पहिल्यांदाच प्रत्येक महसूल मंडळावर अंतर्गत आयोजित शिबिराला २५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी निवेदनातद्वारे सांगितले.

0000000

संबंधित पोस्ट

छत्रपतींच्या जयघोषात, शिवमय वातावरणात भव्य व दिमाखदार“जय शिवाजी जय भारत”पदयात्रा संपन्न

vishwatmaklokswamivarta

गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजन

vishwatmaklokswamivarta

अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना उद्या नियुक्तीपत्रे प्रदान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार.ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घटनात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन

मॅग्नेट 2.0 प्रकल्पाद्वारे पणन विषयक गुंतवणूक, कृषिमालाचे मूल्यवर्धन व रोजगारवाढीस गती देणार – पणन मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे लोकायुक्त अभियान — महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta