vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी मानधन योजनेच्यालाभासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करावा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे         

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी मानधन योजनेच्यालाभासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करावा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे

            सांगली, प्रतिनिधी- राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना सन २०२५-२६ अंतर्गत शासन निर्णय दि.१६ मार्च २०२४ नुसार कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार यांना प्रतिमहा ५ हजार रुपये मानधन देण्यात येते. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर http://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. १ जुलै २०२५ ते दि. ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या योजनेची लाभार्थ्यांची पात्रता पुढीलप्रमाणे – ज्यांचे वय 50 पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट 10 वर्षाने शिथिल करण्यात येत आहे (दिव्यांगांना वयोमर्यादा 40 वर्ष). ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्षे आहे. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा/परितक्त्या/ दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. कलाकारांचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे, असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार. कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे – वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञा पत्र, पती व पत्नी एकत्रीत फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व दाखला (लागू असल्यास), राज्य / केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था / व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास), विविध पुरावे.  ००००००

संबंधित पोस्ट

भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला.

शहीद दिनानिमित्त मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय  भारत सरकार यांच्या वतीने पदयात्रा संपन्न

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी विशेष एनआयए न्यायालयानं ८ सप्टेंबरपर्यंत वाढवली

जिल्हा सामान्य रुग्णालयात रांगोळी व पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर; २२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद

दिव्यांग लाभार्थ्यांनी युडीआइडी व आधार कार्ड ३१ मार्चपूर्वी जमा करावे जिल्हा प्रशासनाचे आवाहन