vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनींमध्येसरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनींमध्येसरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

ठाणे, क्रीडा प्रतिनिधी

– क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा संचालित शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत सन 2025-26 या वर्षाकरिता राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळ निहाय कौशल्य चाचणी अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रवेश देण्याचे सूचित करण्यात आले असून हँडबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्यूदो, जिम्नॅस्टिक या खेळांसाठी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता क्रीडा नैपुण्य चाचण्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात विभागीय स्तरावर 26 ते 27 जून 2025 या कालावधीत चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे दि.24 जून 2025 पर्यंत खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रवेशाकरिता वयोमार्यादा दि.07 जुलै 2006 नंतर जन्मलेले व 08 जुलै 2025 रोजी पर्यंत 19 वर्ष पूर्ण झालेले खेळाडू अर्ज करू शकतात. अर्जाचा नमुना कार्यालयात उपलब्ध असून अर्जासोबत खालील कागदपत्रांची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच क्रीडा प्रबोधिनी चाचणी दरम्यान खेळाडूंनी मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.1. जन्म प्रमाणपत्र

2. आधार कार्ड3. क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र

अधिक माहितीकरिता श्रीमती मनिषा मानकर – 97674 99162, श्रीमती श्रद्धा तळेकर – 72084 50181 श्री. समीर सुर्यवंशी – 8928957957 यांच्याशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी चाचणीमध्ये सहभाग घ्यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के यांनी कळविले आहे.

000000000000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता**ग्रीन मॅरेथॉनव्दारे नेरूळ विभागात पर्यावरण संवर्धन संदेशाचे प्रसारण

खुशालसिंग राणा ठाकुर यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजीत जिल्हास्तरीय फेंटबाल अजिंक्यपद स्पर्धा प्रचंड उत्साहात संपन्न-मुलांच्या गटात जिल्हा परीषद नेर तर मुलींच्या गटात कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय बदनापुर अजिंक्य

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

vishwatmaklokswamivarta

बालगृहातील प्रवेशितांचा जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे-9 ते 11 जानेवारी कालावधीत आयोजन..

खेळाच्या मैदानावरही पाकिस्तानला धूळ चारत भारतानं पटकावलं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद, पाच गडी राखून भारताचा दणदणीत विजय

vishwatmaklokswamivarta

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन