vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

क्रीडा संकुल सोयी सुविधांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

 

सोलापूर, द प्रतिनिधी (जिमाका):- जिल्हा क्रीडा संकुलमधून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करून द्याव्यात, तसेच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रिडा संकुलात सध्या सुरु असलेली विविध क्रीडा प्रकारांच्या पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत तसेच यांनी शासकीय मैदान नेहरूनगर येथील विविध सुविधाबाबतचा आराखडा विहित पद्धतीचा अवलंब करून तयार करावा. तसा प्रस्ताव व अंदाजपत्रक लवकरात लवकर सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी शासकीय मैदान नेहरूनगर या ठिकाणी 9 एकर इतकी जागा उपलब्ध असून उपलब्ध जागेमध्ये 400 चा मीटर धावून मार्ग त्यास संलग्न वॉकिंग ट्रॅक आहे तसेच विविध खेळाची मैदानी असून या ठिकाणी खेळाडू, महिला, जेष्ठ, नागरिक हे सरावासाठी व व्यायामासाठी येत असतात. सदरचा वॉकिंग ट्रॅक जुना असल्याने मैदानाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे क्रीडा अधिकारी यांनी यावेळी सांगितले तसेच मागील सभेचे इतिवृत्त वाचून जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याबाबतच्या कामांची सविस्तर माहिती दिली.

या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल येथे वाढीव क्रीडा सुविधा, 400 मी. धावन मार्ग सिंथेटिक करणे, बॅडमिंटन हॉल अद्ययावत करणे, मुलामुलींचे वसतीगृह दुरुस्त करणे, अंतर्गत रस्ते, सुंदरम नगर येथील जलतरण तलाव दुरूस्तीस निधी, करण्यासाठी अंदाजपत्रके व आराखडे तयार करून घेण्यास मान्यता मिळणे यासह अन्य कामांबाबत चर्चा करण्यात आली.

0000

संबंधित पोस्ट

हिंद-की-चादर” कार्यक्रमानिमित्त नांदेड तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना २४ जानेवारी रोजी #सुट्टी जाहीर       #परीक्षा सुरू असलेल्या ठिकाणी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत जाहीर

vishwatmaklokswamivarta

प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन ,माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन राज्यसभेवर नामनिर्देशित -चारही मान्यवरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या

vishwatmaklokswamivarta

छत्रपतींच्या जयघोषात, शिवमय वातावरणात भव्य व दिमाखदार“जय शिवाजी जय भारत”पदयात्रा संपन्न

vishwatmaklokswamivarta