vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, 20 हजार 787 कोटींची तरतूद राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा 802 कि.मी.चा द्रूतगती मार्ग..

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, 20 हजार 787 कोटींची तरतूद राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा 802 कि.मी.चा द्रूतगती मार्ग..

        राज्य प्रतिनिधी  -राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग) या महाराष्ट्र-गोवा सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (शिघ्रसंचार द्रूतगती मार्ग) प्रकल्पाला गती देण्यासाठी 20 हजार 787 कोटी रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील 12 जिल्ह्यांना जोडणारा हा द्रूतगती मार्ग 802.592 किलोमीटर लांबीचा असणार आहे.

महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांना जोडणार आहे. पुढे तो कोकण द्रूतगती महामार्गास गोवा-महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत. तसेच संतांची कर्मभूमि असलेले मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच 12 ज्योर्तिलिंगापैकी 2 औंढानागनाथ व परळी वैजनाथ, महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, यासह कारंजा-लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे 18 तासांच्या प्रवासाचे अंतर 8 तासांवर येणार आहे.

  या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरिता हुडकोकडून 12 हजार कोटींचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून सुमारे 7 हजार 500 हेक्टरचे भूसंपादन करण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील शक्तीपीठांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न असून, त्यातून पर्यटन, वाहतूक व ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे.

***

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकुटुंब कुंभस्नान वाराणसीत काशी विश्वेश्वराचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

सहकारी साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन योजना’ लागू करण्यासंदर्भात मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करावा- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार· सहकारी साखर कारखान्यांमधून तयार होणाऱ्या उपपदार्थांसाठी स्वतंत्र धोरण आखणार

vishwatmaklokswamivarta

एन. डी. आर. एफ. पथकाने सतर्क राहून कामकाज करावे- जिल्हाधिकारी अशोक काकडे

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट* महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा समावेश* -रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त

महाराष्ट्र लोकसेवा आयोग-महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन*5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक*