vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान राजभवन येथे राष्ट्रपती पोलीस पदकअलंकरण कार्यक्रम संपन्न..

राज्यपालांच्या हस्ते ८३ पोलीस अधिकारी, अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान राजभवन येथे राष्ट्रपती पोलीस पदकअलंकरण कार्यक्रम संपन्न..

मुंबई, प्रतिनिधी: राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील ८३ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

राजभवन येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ तसेच २०२२ या दोन वर्षांच्या स्वातंत्र्यदिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.एक्केचाळीस (४१ ) पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदक, तीन (३) पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच एकोणचाळीस (३९) पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली

पोलीस अलंकरण कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महासमादेशक गृहरक्षक दल रितेश कुमार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अर्चना त्यागी, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांसह पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.राज्यपालांच्या हस्ते पदकाने अलंकृत पोलीस अधिकारी व अंमलदारांची यादी सोबत जोडली आहे.

0000

संबंधित पोस्ट

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024-जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ व पोलीस अधिक्षक बन्सल यांनी केलीभोकरदन विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी व मतदान केंद्राची पाहणी…             

vishwatmaklokswamivarta

स्मारक, संदर्भग्रंथाने रा. सू. गवईंच्या कार्याचा गौरव-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* दिवंगत नेते रा. सू. (दादासाहेब) गवई स्मारकाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील भाजपा नेते आशिष शेलार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नवाब मलिक यांच्याबद्दल भाजपची भूमिका स्पष्ट…

vishwatmaklokswamivarta

गोल्ड  आणि सिल्वर चा : सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी दर; जाणून घ्या आजचा १० ग्रॅमचा भाव

vishwatmaklokswamivarta

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय.

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्ग आणि जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूलाचं लोकार्पण