vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता दिंडी

 

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागातर्फे सकाळी साडेसात व. समता दिंडीचे आयोजन करण्यात आले. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून समता रॅलीची सुरुवात केली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. भडकलगेट येथून मिल कॉर्नर मार्गे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, त्यानंतर दिंडी औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपन्न झाली.समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खराडे, सहायक आयुक्त आर. आर. शिंदे यावेळी उपस्थित होते. दिंडीमध्ये श्री. सरस्वती कन्या प्रशाला, क्रांती चौक येथील बाल ज्ञान मंदिर, शिशुविहार माध्यमिक शाळा, श्री. शारदा मंदिर कन्या प्रशाला, छत्रपती संभाजीनगर या शाळेतील विद्यार्थी, सामाजिक न्याय विभागातील शासकीय वसतिगृहाचे असे ६५० विद्यार्थी सहभागी झाले.

०००००

संबंधित पोस्ट

नसरापूर बलात्कार व खून खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. अजय मिसर यांची नियुक्ती!

गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अग्रिगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे – मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरी आदेश वाटप- संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एकूण ११७ प्रकरणे पात्र- श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची एकूण ८१ प्रकरणे पात्र…

नवी मुंबईकर रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर-सिडकोच्या अखत्यारीतील स्थानके येत्या ६ महिन्यात मध्य रेल्वेकडे होणार हस्तांतरित२० वर्षानंतर ऐतिहासिक निर्णय मध्ये रेल्वे आणि सिडको प्रशासन अधिकारी, शिवसेना पदाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश..

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते-कल्याणकारी योजनांच्या ‍चित्ररथाचे उद्‌घाटन