vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वारकऱ्यांना पथकरातून सूट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पास सुविधा उपलब्ध

वारकऱ्यांना पथकरातून सूट देण्यासाठी आरटीओ कार्यालयात पास सुविधा उपलब्ध

   सांगली, प्रतिनिधी: भाविकांना, वारकऱ्यांना आषाढी एकादशीच्या काळात पथकरातून सूट देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे पास सुविधा उपलब्ध आहे. भाविकांनी, वारकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. पास मिळवण्यासाठी वैध वाहनाचे नोंदणी पुस्तक सोबत घेवून यावे, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आकाश गालिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्याबाबत दिनांक 16 जून 2021 च्या शासन परिपत्रकात निर्देशित केलेले आहे. दि. 18 जून 2025 ते 10 जुलै 2025 या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या-येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठीच पथकरातून सूट देण्यासाठी आषाढी एकादशी २०२५ करिता विहित केलेल्या नमुन्यात सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

मुंबईत रिमझिम पाऊस तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता…मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे प्रकरण,हिंदु संतांचा अवमान करणे, हीच काँग्रेसी संस्कृती; वडेट्टीवार जाहीर माफी मागा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी…

vishwatmaklokswamivarta

मुंबई सह उपनगरात आणि राज्यभरात रात्रभर मुसळधार पावसाची हजेरी

प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण विभाग आढावा बैठकीत पिंक शाळा, शिष्यवृत्ती, शिक्षक समायोजन आदी विषयांवर सखोल चर्चा

गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 198 खासगी तर 286 सार्वजनिक मंडळाचे गणपती उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क…

खारघर येथे होणाऱ्या हिंद दी चादर कार्यक्रमाला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था-नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील 

vishwatmaklokswamivarta